'रावणापेक्षाही राज ठाकरेंकडून उत्तर भारतीयांवर जास्त अत्याचार'

राज ठाकरेंना अयोध्येला जाण्यापासून रोखणाऱ्या बृजभूषण सिंह यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
Brijbhushan Sharan Singh oppose to mns raj thackeray visit ayodhya letter to PM narendra modi
Brijbhushan Sharan Singh oppose to mns raj thackeray visit ayodhya letter to PM narendra modisakal

नवी दिल्ली : अयोध्येला जाण्यापासून राज ठाकरेंना रोखणारे भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. रावणानं जेवढे अत्याचार केले नाहीत तेवढे राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांवर केले, असं बृजभूषण सिंह म्हणाले. एबीपी न्यूजशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. (Raj Thackeray did more atrocities on North Indians than Ravana Brijbhushan Singh)

Brijbhushan Sharan Singh oppose to mns raj thackeray visit ayodhya letter to PM narendra modi
राज्यसभेच्या जागेचा चॅप्टर बंद, लवकरच अधिकृत घोषणा: राऊत

बृजभूषण सिंह म्हणाले, मी कोणताही कोहिनूरचा हिरा मागितला नव्हता. केवळ दोन शब्द मागितले होते माफीचे. यामुळं आमच्या जखमेवर मलम लावलं गेलं असतं. पण राज ठाकरेंचे सहकारी चांगले नाहीत, नाहीतर त्यांनी माफी मागितली असती आणि ५ जूननंतर अयोध्येत आले असते. पण तसं न करता त्यांनी मोठी चूक केली आहे. आता तर उत्तर भारतात कोणत्याच राज्यात राज ठाकरे येऊ शकणार नाहीत, त्यांना विरोध होईल.

Brijbhushan Sharan Singh oppose to mns raj thackeray visit ayodhya letter to PM narendra modi
काँग्रेसच्या 'एक व्यक्ती, एक पद' अभियानाला महाराष्ट्रात सुरुवात; नसिम खान यांचा राजीनामा

आम्हाला वाटतं राज ठाकरे स्वतः एका भ्रमात जगत होते आणि त्याच भ्रमात ते ट्रॅप होत होते. रावणानेही जितके अत्याचार केले नसतील तितके अत्याचार या व्यक्तीनं केले आहेत उत्तर भारतीयांसोबत. मनसेच्या आंदोलनामुळं ८० हजार उत्तर भारतीयांना त्रास झाला. याबदल्यात मी त्यांना काय मगितलं की आता तुमच्यात सुधारणा झाली असेल रामाला शरण यायचं आहे तर सर्वांची माफी मागा कारण आम्ही सर्वजण रामाचे वंशज आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com