राज्यसभेच्या जागेचा चॅप्टर बंद, लवकरच अधिकृत घोषणा: राऊत

संभाजीराजेंचा सन्मान करतोय म्हणून त्यांना आम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हायचा प्रस्ताव ठेवला होता.
Sanjay Raut on Rajyasabha Seat
Sanjay Raut on Rajyasabha Seat sakal
Updated on

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यसभेच्या सहाव्या जागेचा चॅप्टर आता बंद झाला आहे. संजय पवार हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असून लवकरच त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (Chapter of six seat of Rajya Sabha closed now official announcement soon by ShivSena says Sanjay Raut)

Sanjay Raut on Rajyasabha Seat
काँग्रेसच्या 'एक व्यक्ती, एक पद' अभियानाला महाराष्ट्रात सुरुवात; नसिम खान यांचा राजीनामा

राऊत म्हणाले, संजय पवार हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. लवकरच याची अधिकृत घोषणा करण्यात येईल. संजय पवार हे शिवसेनेचे पक्के मावळे आहेत. राज्यसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत. सहाव्या जागेचा चॅप्टर आता बंद झाला आहे. संभाजीराजेंचा आम्ही नक्कीच सन्मान ठेवतोय, त्यासाठीच त्यांना शिवसेनेचे उमेदवार व्हा असा प्रस्ताव आम्ही ठेवला. पण त्यांना अपक्ष लढायचं आहे, निवडून येण्यासाठी ४२ मतांची गरज आहे. जर कोणाकडे ही मतं असतील तर त्यांना त्यांना निवडून द्यावं.

Sanjay Raut on Rajyasabha Seat
काँग्रेसच्या 'एक व्यक्ती, एक पद' अभियानाला महाराष्ट्रात सुरुवात; नसिम खान यांचा राजीनामा

संभाजीराजे जर अपक्ष लढणार आहेत तर त्यांच्याकडे मतांची काय योजना आहे माहिती नाही. पण आमच्याकडे जेव्हा याचा प्रस्ताव आला तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की, गादीचा सन्मान, छत्रपतींच्या वंशजांचा सन्मान ठेऊन शिवसेना तुम्हाला उमेदवारी देईल पण तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा. यापूर्वी शिवसेनेनं काही जणांना उमेदवारी दिली होती पण त्यांना पक्षाचं सदस्यत्व दिलं नव्हतं असा युक्तीवाद संभाजीराजेंचे समर्थक करतात. यावर राऊत म्हणाले, आम्ही कोणालाही उत्तर द्यायला बांधील नाही. त्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती नसावा.

Sanjay Raut on Rajyasabha Seat
पंजाब : भ्रष्टाचाराचे आरोप होताच मंत्र्याची हाकालपट्टी; CM मान यांचा मोठा निर्णय

वरिष्ठ शाहू महाराजांची शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर लोकसभा लढवली. मालोजीराजे भोसले यांनी देखील पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे. स्वतः संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर कोल्हापुरातून निवडणूक लढले आहेत. त्यामुळं महाराजांना पक्षाचं वावडं असू नयेत. देशभरातील अनेक राज्यांचे वंशज पक्षांच्या तिकीटावर निवडणूक लढवून लोकसभेत आणि राज्यसभेत निवडून गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com