
Raj Thackeray Net Worth : अबब! राज ठाकरेंकडे आहेत एवढ्या कोटींची संपत्ती; वाचून व्हाल थक्क
Raj Thackeray Net Worth : महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महत्वाचं नाव जे कोणीही टाळू शकणार नाही. यांच्या सभांना, भाषणांना आणि कार्यक्रमांना तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. लाव रे तो व्हिडीओ असो, हनुमान चालिसा, परप्रांतिय वाद किंवा अगदी मराठी भाषा अशा अनेक मुद्द्यांनी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे कायम चर्चेत असतात.
त्यांचं उत्पन्न किती हा सुद्धा अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय असतो.
ठाकरे कुटुंबात जन्मल्यामुळे सुरुवातीला राज ठाकरे शिवसेनेत बाळासाहेबांच्या हाताखाली राजकारणाचे धडे घेत होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या वादातून राज शिवसेनेबाहेर पडले. त्यांनी स्वतःचा पक्ष निर्माण केला. त्यातून २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उदय झाला. यावेळी त्यांनी सर्व तरुणांना पक्षात सामिल करून घेत तरुणांचे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न महाराष्ट्राला दाखवले. राज्यातल्या तरुणांना सक्रिय राजकारणात येण्याचं आवाहन केलं.
राज ठाकरेंविषयी थोडक्यात
राज ठाकरे हे सध्याच्या प्रसिद्ध राजकारण्यांपैकी एक आहेत.
शिवसेना प्रमुख बाळासाहोब ठाकरे यांचे ते पुतणे.
राज ठाकरेंचा जन्म १४ जून १९६८ चा आहे.
त्यांचा जन्म, शिक्षण आणि करिअर सगळं मुंबईमध्ये झालं आहे.
त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आहे.
त्यांना मुळातच कलेची आवड आहे.
लिखाण, वाचन, चित्रकला, सिनेमा हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत.
राज ठाकरे यांची संपत्ती
कुंदा आणि श्रीकांत ठाकरे कुटुंबात राज यांचा जन्म झाला.
राज ठाकरे हे पूर्णवेळ राजकारणी आहेत.
याशिवाय इलस्ट्रेशन आणि सिनेमा या विषयांमध्ये त्यांना विशेष रुची आहे.
त्यांचे दादरसारख्या मध्यवर्ती भागात कृष्णकुंज आणि शिवतीर्थ असे बंगले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार साधारण ५० लाख रुपये पगार आहे.
आणि एकुण मालमत्ता सुमारे ५० कोटींची आहे.