Raja Raghuvanshi Honeymoon Killed Case : इंदूरमधील प्रसिद्ध वाहतूक व्यवसायिक राजा रघुवंशीच्या (Raja Raghuvanshi) हत्या प्रकरणाला आता एक धक्कादायक वळण प्राप्त झालंय. मेघालय पोलिसांच्या (Meghalaya Police) तपासादरम्यान आरोपी पत्नी सोनम रघुवंशीनं तिचा प्रियकर राज कुशवाहासोबत असलेले प्रेमसंबंध उघड करत मोठा खुलासा केला आहे. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 'सोनमनं कबूल केलंय की, ती आणि राज कुशवाहा (Raj Kushwaha) दोघं मिळून राजा रघुवंशीला आयुष्यातून काढून टाकण्याचा कट रचत होते.'