Raja Raghuvanshi murder case 2025 : राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाने आता वेग घेतला आहे. सोनमच्या अटकेनंतर एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सोनमने राजाच्या हत्येसाठी 20 लाख रुपयांची सुपारी दिल्याची बाबही उघड झाली आहे. इतकेच नाही, तर राजाच्या हत्येनंतर सोनमने इंदौरमध्ये राज कुशवाहसोबत वेळ घालवल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे.