
इंदौरच्या राजा रघुवंशी याचा मृतदेह सापडल्यानंतर आठवड्याभराने अखेर त्याची पत्नी सोनमचा शोध संपला आहे. उत्तर प्रदेशातील गाझीपूर इथं तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं. एका ढाब्यावरून तिने घरी फोन केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, सोनमसह पोलिसांनी एकूण चौघांना राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. सोनमने राजा रघुवंशीच्या हत्येसाठी तिघांना सुपारी दिली होती आणि त्यानंतरच मेघालयात त्याची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. तर, कुटुंबियांनी पोलीस खोटं सांगत असल्याचा आरोप केला आहे.