
इंदौरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणी त्याची पत्नी सोनम हिच्यासह आणखी चौघांना अटक करण्यात आलीय. त्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. सुरुवातीला राजाच्या हत्येनंतर अपहरण झाल्याचा दावा सोनमने केला होता. पण पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हत्याकांडाची मास्टरमाइंड तिच असल्याचं समोर आलं. इंदौरहून शिलाँगला हनीमूनला गेल्यानंतर कपल बेपत्ता झालं होतं. राजाचा मृतदेह सापडल्यानंतर सोनम आठवड्याभराने उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये सापडली पण त्याआधी ती इंदौरमध्येच राहिली होती अशी माहिती आता समोर येत आहे.