esakal | माझ्या पक्षालाही मी सहन करणार नाही : राजासिंह
sakal

बोलून बातमी शोधा

raja singh

‘गो मातेच्या संरक्षणाच्या कार्यात माझ्या पक्षाने जरी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, तर ते अजिबात सहन करणार नाही,’ असे विधान करत तेलंगणमधील भाजपचे आमदार राजासिंह यांनी पक्षाच्या गोटात खळबळ उडवून दिली. त्यांनी आज ‘गोरक्षा महाधरणे आंदोलना’त सहभाग घेत भाषण केले.

माझ्या पक्षालाही मी सहन करणार नाही : राजासिंह

sakal_logo
By
आर. एच. विद्या

हैदराबाद - ‘गो मातेच्या संरक्षणाच्या कार्यात माझ्या पक्षाने जरी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, तर ते अजिबात सहन करणार नाही,’ असे विधान करत तेलंगणमधील भाजपचे आमदार राजासिंह यांनी पक्षाच्या गोटात खळबळ उडवून दिली. त्यांनी आज ‘गोरक्षा महाधरणे आंदोलना’त सहभाग घेत भाषण केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ते म्हणाले की, ‘गो मातेच्या संरक्षणाच्या माझ्या कामात अडथळा सहन करणार नाही. माझा पक्ष जरी अडचण निर्माण करत असेल तर सहन करणार नाही, स्वत:च्या पक्षालाच तुडवून टाकेन. गो रक्षेच्या मुद्द्यावर मी आधीच राजीनामा देण्यास तयार होतो, मात्र पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी मला रोखले.

गुजरातमध्ये होणार जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय; रिलायन्स करतंय उभारणी!

राज्यातील भाजपचा मी एकमेव आमदार असल्याने त्यांनी मला विनविले होते. मात्र, गोमाता माझी आई आहे आणि गोरक्षा हे माझे कर्तव्य आहे. यासाठी मी काहीही करेन. गरज पडल्यास पक्ष आणि पदही सोडून देईन.’’ गाईला राष्ट्रीय प्राणी म्हणून तत्काळ जाहीर करावे, अशी मागणीही राजासिंह यांनी केली.

Edited By - Prashant Patil

loading image