esakal | राजस्थानमध्ये 11 पाकिस्तानी शरणार्थींचे आढळले मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

rajasthan 11 pakistani died in suspicious condition in jodhpur

राजस्थानातील या जिल्ह्यातील लोडटा गावात पाकिस्तानातील हिंदू स्थलांतरित कुटुंबातील ११ सदस्य मृतावस्थेत आढळले. या कुटुंबातील एकजण मात्र झोपडीबाहेर जिवंत आढळला. मात्र, त्याने या घटनेबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले.

राजस्थानमध्ये 11 पाकिस्तानी शरणार्थींचे आढळले मृतदेह

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जोधपूर : राजस्थानातील या जिल्ह्यातील लोडटा गावात पाकिस्तानातील हिंदू स्थलांतरित कुटुंबातील ११ सदस्य मृतावस्थेत आढळले. या कुटुंबातील एकजण मात्र झोपडीबाहेर जिवंत आढळला. मात्र, त्याने या घटनेबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले, अशी माहिती पोलिस अधीक्षक (ग्रामीण) राहुल बारहाट यांनी दिली. सर्वजणांनी विषारी रसायन प्राशन करून आत्महत्या केल्याची प्रथमदर्शनी दिसते. मात्र, त्यांच्या मृत्यूचे निश्चित कारण लगेच सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब पाकिस्तानातून विस्थापित झाले होते. 11 जणांना विष दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मृतांमध्ये 6 जणांसह 5 लहान मुलांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कुटुंबातील नर्स असणारी बहिण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी जोधपूरला आली होती. त्यानंतर येथेच राहात होती. बहिणीने प्रथम या 10 लोकांना विषारी इंजेक्शन्स दिले आणि नंतर स्वत: लाही इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे. या कुटुंबातील एक सदस्य अगोदरच शेतात गेला होता. रात्री शेतामध्येच होता, सकाळी घरी आल्यानंतर त्याला सर्वांचे मृतदेह दिसले.

बाळाला पुरलं जीवंत अन् रात्री आला रडण्याचा आवाज...