esakal | Live Video: राजस्थानच्या चंबळ नदीत बोट बुडाली; पाच जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

rajasthan 50 people washed away in chambal river video viral

बुंदीच्या चंदा खुर्दमध्ये चंबळ नदीमध्ये 50 प्रवासी घेऊन निघालेली बोट बुडाली. या घटनेत 25-30 जण बुडाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.  पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, 10 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे.

Live Video: राजस्थानच्या चंबळ नदीत बोट बुडाली; पाच जणांचा मृत्यू

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बूंदी (राजस्थान): बुंदीच्या चंदा खुर्दमध्ये चंबळ नदीमध्ये 50 प्रवासी घेऊन निघालेली बोट बुडाली. या घटनेत 25-30 जण बुडाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.  पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, 10 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

शंख वाजवून कोरोनाला पळवा म्हणणाऱ्या खासदाराला कोरोनाची लागण

राजस्थानमध्ये सततच्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राजस्थानमधील बूंदी जिल्ह्याच्या सीमालगत भागात गोठडा कला गावाजवळ ही मोठी दुर्घटना घडली. 50 नागरिकांना एका ठिकाणहून दुसरीकडे घेऊन जाणारी बोट किनाऱ्यापासून काही अंतरावर असताना उलटली आणि मोठी दुर्घटना घडली. या बोटीमध्ये साधारण 50 प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे. काही कळायच्या आता बोट उलटल्याने नागरिकांनी आरडाओरड केली. शिवाय, अनेकांनी बुडण्याच्या भीतीने जीव वाचवण्यासाठी नदीत उड्या मारल्या. पोहता येत असलेल्या नागरिकांनी पोहून काठावर आले. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. उर्वरीत नागरिकांचा शोध सुरू आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बचाव आणि मदत पथकेही कोटा येथून रवाना झाले आहेत. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीमध्ये साधारण 50 प्रवासी होते.