शंख वाजवून कोरोनाला पळवा म्हणणाऱ्या खासदाराला कोरोनाची लागण

वृत्तसंस्था
Tuesday, 15 September 2020

चिखलामध्ये बसून शंख वाजवून कोरोनाला पळवा म्हणणाऱया खासादारालो कोरोनाची लागण झाली आहे. संसदेच्या अधिवेशनापूर्वीच झालेल्या चाचणीत हे खासदार कोरोना पॉझिटीव्ह आले असून, भारतीय जनता पक्षाचे मधोपूर येथील खासदार सुखबीर सिंग जौनापुरिया हे त्यांचे नाव आहे.

नवी दिल्ली: चिखलामध्ये बसून शंख वाजवून कोरोनाला पळवा म्हणणाऱया खासादारालो कोरोनाची लागण झाली आहे. संसदेच्या अधिवेशनापूर्वीच झालेल्या चाचणीत हे खासदार कोरोना पॉझिटीव्ह आले असून, भारतीय जनता पक्षाचे मधोपूर येथील खासदार सुखबीर सिंग जौनापुरिया हे त्यांचे नाव आहे.

Video: ...म्हणून भाजप आमदाराने चिखलात बसून वाजवला शंख

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जौनापुरिया यांनी कोरोनाला पळवून लावण्यासाठी चिखलात बसणे हा उत्तम उपाय असल्याचा दावा केला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जौनापुरिया हे चिखलात बसले होते. अंगाला चिखल लावून शंख वाजवत होते. त्यांनी कोरोनाला पळवून लावण्यासाठी व शरीराची प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी हा उत्तम उपाय असल्याचा दावा केला होता. यापूर्वीही २१ जून रोजी योगा दिना निमित्त शरीराला चिखल लावत योगा केला होता. अखेर, कोरोनाची त्यांना लागण झाली आहे.

केंद्रीय मंत्री म्हणतात; 'भाभीजी पापड' खा आणि कोरोनामुक्त व्हा...

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपचे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी 'भाभीजी पापड' खाल्याने प्रतिकारक क्षमता वाढते असा दावा केला होता. त्याआधी भोपाळचे भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दररोज हनुमान चलिसा म्हणा व कोरोना पळवा असा सल्ला दिला होता. जौनापुरिया यांनीही चिखलात बसणे हा उत्तम उपाय असल्याचा दावा केला होता.

संसदेचे पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या अगोदर सर्वच खासदारांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर केलेल्या चाचणीत तब्बल 30 खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. विशेष म्हणजे संसदेतील 50 पेक्षा जास्त कर्मचारीही कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह आलेल्या खासदारांच्या नावांमध्ये भाजपा खासदार सुखबीरसिंह जौनापुरिया यांचाही समावेश आहे. ज्या खासदार आणि कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, त्यांना विलगीकरणात राहण्याचे सांगण्यात आले आहे, तसेच अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित न राहण्याचेही सूचवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp mp who advised conch blowing mud baths to build immunity tests covid positive