Accident News: स्लीपर बस आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात! ४ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये माय-लेकराचा समावेश; काही प्रवाशी जखमी

Rajasthan Road Accident: आग्रा-जयपूर राष्ट्रीय महामार्गावर दाट धुक्यामुळे एका स्लीपर बसने महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रेलरला मागून धडक दिली. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला.
Agra Jaipur National Highway accident

Agra Jaipur National Highway accident

ESakal

Updated on

राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील सेवार पोलीस स्टेशन परिसरात आग्रा-जयपूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एक भीषण रस्ता अपघात घडला. दाट धुक्यात एका स्लीपर बसने महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रेलरला मागून धडक दिली. ज्यामुळे चार प्रवासी ठार झाले आणि पाच जण जखमी झाले. मृतांमध्ये उत्तर प्रदेशातील एक महिला आणि तिचा अल्पवयीन मुलगा यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com