मोदींनी भारतमाता नव्हे तर 'त्यांना' जय म्हणावे: राहुल गांधी

rahul gandhi and narendra modi
rahul gandhi and narendra modi

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भारत माता की जय' ऐवजी 'नीरव मोदी की जय, मेहुल चोक्सी की जय, विजय मल्ल्या की जय, अनिल अंबानी की जय' असे म्हणायला हवे, असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (मंगळवार) लगावला आहे.

राजस्थान विधानसभा निवडणकीपुर्वी गांधी यांचा शेवटची प्रचार सभा आहे. अलवार येथे प्रचारसभेवेळी बोलताना गांधी म्हणाले, मोदींना जर खरंच भारतमातेचा जयजयकार करायचा असता तर ते शेतकऱ्यांना कधीच विसरले नसते. मोदी त्यांच्या भाषणात कधीच राफेल करारासंदर्भात बोलत नाही. जर ते काही बोलले तर नागरिकच 'चौकीदार चोर है' अशा घोषणा देतील. मोदींनी कल्याणकारी योजना खरंच राबवली का?, सर्व पैसा हा भ्रष्टांचारांकडे जात आहे, ज्यांनी देशाला लुबाडले ते देश सोडून पळून गेले आहेत. आता सरकारने कल्याणकारी योजनांचे नाव बदलून नीरव मोदी योजना, अंबानी योजना असे ठेवावे. देशातील उद्योगपतींनी मोदींना सत्तेत आणले. जनतेच्या पैशांमधून त्यांना उद्योगपतींनी पंतप्रधानपदी बसवले. मोदी यांनी 'भारत माता की जय' ऐवजी 'नीरव मोदी की जय, मेहुल चोक्सी की जय, विजय मल्ल्या की जय, अनिल अंबानी की जय' बोलावे.'

'काँग्रेसची सत्ता असताना गॅस सिलिंडर 360 रुपयांना मिळत होता. भाजपाच्या काळात गॅस सिलिंडरचे दर काय झाले?, मोदीजी काँग्रेसच्या काळात इंधन, गॅस याचे दर काय होते यावर कधीच भाष्य करत नाही. त्यांनी नागरिकांना लाभापासून वंचित ठेवले आहे. देशातील दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले. युवकांना रोजगार मिळाला असता तर अलवारच्या चार तरुणांनी आत्महत्या का केली असती?, वसुंधरा राजे सरकारला आता राजस्थानमध्ये भविष्य उरलेले नाही,' असेही गांधी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com