Congress MLA : राहुल गांधींना 'जोकर' म्हणणाऱ्या काँग्रेस आमदाराचं निधन; वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Bhanwarlal Sharma Passes Away

'शर्मा यांच्यावर भैरोसिंग शेखावत आणि गेहलोत सरकार पाडल्याचा आरोप होता.'

Congress MLA : राहुल गांधींना 'जोकर' म्हणणाऱ्या काँग्रेस आमदाराचं निधन

MLA Bhanwarlal Sharma Passes Away : राजस्थानमधील काँग्रेसचे (Rajasthan Congress) ज्येष्ठ आमदार भंवरलाल शर्मा (MLA Bhanwarlal Sharma) यांचं आज निधन झालं. एसएमएस हॉस्पिटलच्या (SMS Hospital) मेडिकल आयसीयूमध्ये त्यांनी सकाळी 7.35 वाजता अखेरचा श्वास घेतला.

आमदार भंवरलाल शर्मा यांना शनिवारी सकाळी एसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. न्यूमोनिया, किडनी संसर्ग यासह अनेक समस्यांमुळं त्यांना दाखल करण्यात आलं होतं. अधीक्षक डॉ. अचल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय मंडळाकडून एसएमएस हॉस्पिटलची तपासणी करण्यात आली. शनिवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी एसएमएस हॉस्पिटलमध्ये जाऊन शर्मांच्या प्रकृतीची माहिती घेतली. भंवरलाल शर्मा सरदार शहरमधून 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

हेही वाचा: मुसलमान सर्वात जास्त कंडोम वापरतात, लोकसंख्या कुठं वाढतेय? ओवैसींचा भागवतांना थेट सवाल

काँग्रेसचे आमदार भंवरलाल शर्मा हे पायलट गटाचे असल्याची माहिती होती. मात्र, नंतर सीएम गेहलोत त्यांचं कौतुक करून ते चर्चेत आले. भंवरलाल शर्मा यांच्यावर भैरोसिंग शेखावत आणि गेहलोत सरकार पाडल्याचा आरोप होता. गेहलोत सरकार पाडण्यात आणि वाचवण्यात भंवरलाल शर्मा यांची महत्त्वाची भूमिका मानली जात होती. चुरू जिल्ह्यातील सरदार शहरामधील काँग्रेस आमदार भंवरलाल शर्मा यांचं रविवारी सकाळी वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालं. न्यूमोनियाचा त्रास वाढल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. भंवरलाल शर्मा यांनी एसएमएस हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान आयसीयूमध्ये अखेरचा श्वास घेतला.

हेही वाचा: Amit Shah : ..त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यानं मला भररस्त्यात बेदम मारलं होतं; अमित शहांनी सांगितला 'किस्सा'

काँग्रेस आमदाराची राहुल गांधींवर टीका

काँग्रेस आमदार भंवरलाल शर्मा हे मे 2014 मध्ये राहुल गांधींबाबत केलेल्या वक्तव्यामुळं चर्चेत आले होते. आमदार भंवरलाल शर्मा यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि त्यांच्या सल्लागारांना विदूषक म्हटलं होतं. यानंतर काँग्रेसनं राहुल गांधींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या भंवरलाल शर्मा यांना पक्षातून निलंबित केलं. भंवरलाल शर्मांनी राहुल गांधींना जोकर म्हटलं होतं. ते म्हणाले, गांधी घराण्यातील सदस्य असल्यानं राहुल यांच्यावर एवढी मोठी जबाबदारी देण्यात आलीय. पण, त्यांना फारसा अनुभव नाही, असं ते म्हणाले होते.