Sachin Pilot : सचिन पायलटच होणार राजस्थानचे नवे मुख्यमंत्री? आज काँग्रेस आमदारांची महत्वपूर्ण बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Gehlot Sachin Pilot

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत सुरू असलेला 'सस्पेन्स' आज संध्याकाळपर्यंत संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

Sachin Pilot : सचिन पायलटच होणार राजस्थानचे नवे मुख्यमंत्री? आज काँग्रेस आमदारांची महत्वपूर्ण बैठक

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत (Chief Minister of Rajasthan) सुरू असलेला 'सस्पेन्स' आज (रविवार) संध्याकाळपर्यंत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. सध्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक (Congress President Election) लढवणार आहेत. अशोक गेहलोत यांचा विजय होईल, असा पक्षालाही विश्वास आहे.

अशा स्थितीत त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागणार आहे. दरम्यान, राजस्थानमधील काँग्रेस आमदारांची अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी सायंकाळी 7 वाजता बैठक बोलावण्यात आलीय. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Senior leader Mallikarjun Kharge) आणि अजय माकनही (Ajay Maken) उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा: ठरलं! शशी थरूर अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, प्रतिनिधीनं घेतला उमेदवारी अर्ज

सचिन पायलट यांनाच पहिली पसंती

मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट (Sachin Pilot) यांना पहिली पसंती असून त्यांच्या नावाबाबत आमदारांची मतं जाणून घेतली जाणार आहेत. अशोक गेहलोत हे काँग्रेसचे पुढील अध्यक्ष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळंच राजस्थानमध्ये पुढील सीएमबाबत चर्चा सुरुय. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी सायंकाळी ट्विट केलं की, "माननीय काँग्रेस अध्यक्षांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (CLP) बैठकीला उपस्थित राहण्यासाठी AICC महासचिव, राजस्थानचे प्रभारी अजय माकन यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे."

हेही वाचा: Congress : निवडणुकीत चुरस वाढत असतानाच पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान; गेहलोतांबाबत म्हणाले..

गेहलोत 28 तारखेला काँग्रेस अध्यक्षपदासाठी फॉर्म भरणार

काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितलं की, नवीन मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित करण्यापूर्वी आमदारांची मतं आणि सूचनांचा विचार केला जाणार आहे. दरम्यान, अशोक गेहलोत आज सकाळी जैसलमेरला जाऊन तनोट मातेचं दर्शन घेणार आहेत. दुपारी 4.30 पर्यंत ते जयपूरला परतण्याची शक्यता आहे. अशोक गेहलोत 28 तारखेला काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी फॉर्म भरणार असल्याचंही कळतंय.