esakal | सचिन पायलट यांच्या चुकांमुळं बंड फसलं; काँग्रेस आमदारानं सांगितलं कारण!
sakal

बोलून बातमी शोधा

rajasthan congress sachin pilot mistakes prashant bairwa reaction

आमदार प्रशांत बैरवा यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. बैरवा म्हणाले, 'सचिन पायलट यांनी चुकीच्या माणसांवर विश्वास टाकला. मुळात त्यांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच पायलट यांना पहिला धक्का दिला.'

सचिन पायलट यांच्या चुकांमुळं बंड फसलं; काँग्रेस आमदारानं सांगितलं कारण!

sakal_logo
By
रविराज गायकवाड

जैसलमेर (Rajasthan Congress):राजस्थान काँग्रेसमधील बंडाच्या एक-एक गोष्टी पुढे येऊ लागल्या आहेत. अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या गटातील काही आमदारांनी मीडियाला प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातून सचिन पायलट (Sachin Pilot) यांचं बंड नेमकं कुठं फसलं? याची माहिती मिळत आहे. सचिन पायलट आमदारांनी नीट बोलले देखील नाहीत, अशी माहिती गेहलोत गटातील एका आमदारानं दिलीय. 

देशभरातील इतर घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले काँग्रेस आमदार?
जैसलमेरमध्ये सध्या एकत्र ठेवण्यात आलेल्या काँग्रेस आमदारांपैकी गेहलोत गटातील आमदार प्रशांत बैरवा यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. बैरवा म्हणाले, 'सचिन पायलट यांनी चुकीच्या माणसांवर विश्वास टाकला. मुळात त्यांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच पायलट यांना पहिला धक्का दिला. पायलट यांचे सल्लागारच चुकीचे होते. पायलट यांनी आमच्या सारख्यांचा सल्ला घेतला असता तर, कदाचित त्यांच्याकडे जास्त आमदार असते. पायलट यांच्याकडे 19 बंडखोर आमदार होते. त्याच्या जागी 40 ते 45 आमदार असते.' पायलट यांना सल्ला देणाऱ्यांपैकी व्यक्तींचा उल्लेख करताना बैरवा यांनी 'जयचंद' नावाचा उल्लेख केला आहे. बैरवा म्हणाले, 'आम्हीही त्यांचे (पायलट) शुभचिंतक आहोत. पण, म्हणून आम्ही काँग्रेसला मतदान करणार नाही, अस नाही. आम्ही 100 टक्के काँग्रेसला मतदान करणार. मला कोणाचेही नाव घ्यायचे नाही. पण, त्यांनी पायलट यांना धक्का देऊन ते आता आमच्यासोबत आले आहेत.'

आणखी वाचा - दिल्लीत केजरीवालांची भन्नाट स्कीम; इलेक्ट्रिक गाडी खरेदी केल्यास मिळणार पैसे 

भाजपचाच हात 
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सुरुवातीपासून या सगळ्या घडामोडींमागे भाजपचा आणि केंद्राचा हात असल्याचा आरोप केला होता. त्या दाव्याला आता बळ मिळत असल्याचं दिसत आहे. गेहलोत गटातील आमदारांनीही या बंडामागे भाजपच असल्याचं म्हटलंय. पण, सचिन पायलट यांनी मात्र सुरुवातीपासून आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. दुसरीकडं मुख्यमंत्री गेहलोत यांनी थेट पंतप्रधान मोदींवर आरोप केले होते. बैरवा यांनी भाजपचा या सगळ्यात हात असल्याचं सांगताना, हरियाणा पोलिसांचा संदर्भ दिला. ते म्हणाले, 'जर, भाजपचा यामागे हात नसता तर, बंडखोर आमदार गुरुग्राममध्ये हरियाणा पोलिसांच्या संरक्षणात नसते. त्यातील अनेक आमदार आमच्याकडे परत येण्यास इच्छुक आहेत. परंतु, त्यांना अडवलं जात आहे.'