Video : कुछ-कुछ होण्यापूर्वीच मिळाली नोटीस...

वृत्तसंस्था
Tuesday, 27 August 2019

विवाहापूर्वी प्री वेडिंगची क्रेज दिवसेंदिवस वाढत आहे. विवाहापूर्वी अनेकजण प्री वेडिंग करत असून, एका पोलिसाने विवाहापूर्वी प्री वेडिंग केले आहे.

जयपूर (राजस्थान): विवाहापूर्वी प्री वेडिंगची क्रेज दिवसेंदिवस वाढत आहे. विवाहापूर्वी अनेकजण प्री वेडिंग करत असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करताना दिसतात. मात्र, येथील एका पोलिसाला प्री वेडिंग महागात पडली आहे.

एका पोलिसाने विवाहापूर्वी प्री वेडिंग केले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठानी त्या पोलिसाला नोटिस बजावली आहे. पोलिसाच्या गणवेशामध्ये प्री वेडिंग केल्यामुळे नोटिस पाठवण्यात आली असून, या पोलिसाला प्री वेडिंग महागात पडल्याची चर्चा रंगली आहे.

प्री वेडिंगच्या व्हिडिओमध्ये पोलिसाच्या गणवेशामध्ये दाखवण्यात आले आहे. वाहतूक नियमन करताना होणाऱया पत्नीला तो अडवताना दिसत आहे. यानंतर संबंधित युवती माफी मागताना पोलिसाच्या खिशामध्ये नोट ठेवताना दिसत आहे. शेवटी, युवती पोलिसाच्या खिशामधून पाकिट काढताना दिसत आहे. पाकिट परत करण्यासाठी परत त्या पोलिसाची भेट घेते व दोघांमध्ये प्रेम सुरू होते, असे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.

प्री वेडिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलिस चर्चेत आला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत. मात्र, नोटिसीमुळे अडचणीतही भर पडली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajasthan Cop Bribed By Bride In Pre Wedding Video