प्रियांका गांधींमुळे पोस्टर पुन्हा झळकले; पायलट 'उड्डाण' रोखणार?

सुशांत जाधव
सोमवार, 13 जुलै 2020

प्रियांका गांधी या सचिन पायलट  यांचे मन वळवण्यात यशस्वी ठरणार का? ते  आपली भूमिका बदलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

नवी दिल्ली: राजस्थानचे मुख्यंमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलच यांच्यातील गटबाजी चव्हाट्यावर आल्यानंतर राजस्थामध्ये काँग्रेस संकटात सापडली आहे. राजस्थानमधील काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत सचिन पायलट यांच्यासह अन्य काही आमदार अनुपस्थितीत असल्याची चर्चा रंगत असताना यासंपूर्ण प्रकरणात आता गांधी कुटुंबियातील मंडळी पुढे येत आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधीही या प्रकरणात मध्यस्थीसाठी पुढे आल्याची चर्चा सुरु झाली आहे.

ना भाजप ना काँग्रेस; सचिन पायलट यांनी निवडला हा पर्याय?

प्रियांका गांधी यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर सचिन पायलट यांच्यासोबत पुन्हा चर्चा सुरु करण्यात आली आहे.  सचिन पायलट काँग्रेसची साथ सोडणार असल्याच्या वृत्तानंतर दिल्लीतील काँग्रेस कार्यालयातून सचिन पायलट यांचे फोटो असणारे होर्डिंग्स काढण्यात आले होते. मात्र आता प्रियांका गांधींनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर काढून ठेवलेले  होर्डिंग्स पुन्हा कार्यालयात लावण्यात आल्याचे समजते. प्रियांका गांधी या सचिन पायलट  यांचे मन वळवण्यात यशस्वी ठरणार का? सचिन पायलट आपली भूमिका बदलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  

अखेर ट्रम्प यांच्या तोंडाला मास्क; रुग्णालयात जाण्यापूर्वी घेतली खबरदारी

तत्पर्वी राजस्थानचे मुख्यंत्री अशोक गहलोत यांनी आपल्या निवासस्थानी आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला 100 हून अधिक आमदारांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री गहलोत यांनी 10 पेक्षा अधिक अपक्ष उमेदवारांना एकत्रित करुन राजस्थानमधील काँग्रेस सरकार स्थिर राहिल असा संदेशही दिला. परंतु या बैठकीला सचिन पायलट आणि त्यांच्या गटातील आमदार उपस्थितीत नव्हते. पायलट हे काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये जाण्याऐवजी नवा पक्ष उभारणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajasthan crisis talk with sachin pilot again on priyanka gandhi intervention