esakal | Rajasthan: महिला कर्मचाऱ्यांच्या शाळेत भांडणे जास्त : शिक्षण मंत्री दोतास्रा
sakal

बोलून बातमी शोधा

राजस्थानचे शिक्षण मंत्री गोविंदसिंह दोतास्रा

महिला कर्मचाऱ्यांच्या शाळेत भांडणे जास्त : शिक्षण मंत्री दोतास्रा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जयपूर : महिला कर्मचारी जास्त असलेल्या शाळांमध्ये भांडणाचे प्रमाणही जास्त असते, असे धक्कादायक विधान राजस्थानचे शिक्षण मंत्री गोविंदसिंह दोतास्रा यांनी केले. बालिका अपत्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. दोतास्त्रा असेही म्हणाले की, महिला कर्मचाऱ्यांनी आपली भांडणे आपापसांत मिटविली तर त्या नेहमीच पुरुषांच्या फार पुढे जातील.

महिलांना दोष देण्याचाकडेच त्यांचा रोख होता. त्यांनी सांगितले की, माझ्या खात्याचा प्रमुख या नात्याने मला हे निदर्शनास आणून द्यावे लागेल की महिला कर्मचारी जास्त असलेल्या शाळांत सारखेच वाद होतात. कधी रजेवरून, तर एरवी दुसऱ्या कोणत्या तरी कारणावरून खटके उडतात. त्यामुळे एक तर प्राचार्य किंवा इतर शिक्षकांना (डोकेदुखीमुळे) सॅरीडॉनची गोळी घ्यावी लागते.

हेही वाचा: मी लोळत जाईन, नाही तर गडगडत : उदयनराजे

दोतास्रा हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही आहेत. आपल्या सरकारने महिलांच्या सुरक्षा आणि आरामासाठी नेहमीच दक्षता घेतल्याचा आणि त्यांना त्यांना सोईच्या ठिकाणी नोकरी दिल्याचा दावाही त्यांनी केला. यानंतरही महिला कर्मचारी आपापसांत नेहमीच वाद घालतात असेही त्यांनी नमूद केले. महिलांना उद्देशून ते म्हणाले की, तुम्ही या क्षुल्लक गोष्टींमध्ये सुधारणा केलीत तर स्वतःला पुरुषांच्या तुलनेत कितीतरी पुढे पाहाल.

loading image
go to top