राजस्थानमध्ये लिंग गुणोत्तर सुधारले 

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 मे 2018

राजस्थानमधील लिंग गुणोत्तरात कमालीची सुधारणा झाली असल्याचे दिसून आले आहे. 2011 मध्ये राज्यात दर एक हजार पुरुषांमागे 888 स्त्रिया होत्या. 2017-18 हेच प्रमाण 950 इतके झाले आहे.
 

जयपूर : राजस्थानमधील लिंग गुणोत्तरात कमालीची सुधारणा झाली असल्याचे दिसून आले आहे. 2011 मध्ये राज्यात दर एक हजार पुरुषांमागे 888 स्त्रिया होत्या. 2017-18 हेच प्रमाण 950 इतके झाले आहे.

गर्भलिंग चाचणीविरोधी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केल्याचा हा परिणाम दिसून आल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्य सरकारने या कायद्याचा आधार घेत बेकायदा गर्भलिंग चाचणी करणाऱ्यांना कडक शासन केल्याने गैरप्रकार करणाऱ्यांवर जरब बसल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. राजस्थान पोलिसांनी गेल्या काही काळात बेकायदा गर्भलिंग चाचणी करून गर्भपात केलेल्या अथवा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 170 डॉक्‍टरांना आणि 106 इतर लोकांना अटक केली आहे. 

Web Title: Rajasthan improved sex ratio