Jhalawar Incident School : राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील मानपासंद गावात शुक्रवारी सकाळी एक भीषण दुर्घटना (Jhalawar School Roof Collapse) घडली. मनोहर ठाणे विधानसभा मतदारसंघातील सरकारी उच्च प्राथमिक शाळा (Government School), पिपलोडीच्या इमारतीचे छत मुसळधार पावसामुळे कोसळले. या घटनेत किमान ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत.