भारताचं अनोखं गाव! ५३२ वर्षांचा इतिहास, घराघरांतून घडले IAS-IPS अधिकारी अन् सैन्यातील जवान

History of 532-Year-Old Budania Village in Rajasthan : राजस्थानमधील ५३२ वर्षांचा इतिहास असलेल्या बुडानिया गावाने देशाला IAS, IPS अधिकारी, शूर जवान आणि आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेती खेळाडू दिली आहे.
Budania village in Rajasthan's Jhunjhunu district, established in 1494, is known for its 532-year-old history and personalities who have excelled in civil services, Indian defence and international sports

Budania village in Rajasthan's Jhunjhunu district, established in 1494, is known for its 532-year-old history and personalities who have excelled in civil services, Indian defence and international sports

esakal

Updated on: 

राजस्थानमध्ये झुंझुनू जिल्ह्यात एक असं गाव आहे, ज्याचा इतिहास तब्बल ५३२ वर्षांपूर्वीचा आहे. काळानुसार या गावाच्या सामाजिक रचनेत आणि परिस्थितीत अनेक बदल झाले. मात्र, गावाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. देशाच्या संरक्षणासाठी सैन्यात सेवा देणाऱ्या जवानांपासून ते प्रशासकीय सेवांमधील IAS, IPS आणि RAS अधिकाऱ्यांपर्यंत अनेक कर्तृत्ववान व्यक्ती या गावातून पुढे आल्या आहेत. विशेष म्हणजे, याच गावातील एका मुलीने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून गावाचा नावलौकिक वाढवला आहे. राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील बुडानिया हे ते गाव आहे. या गावाची स्थापना १४९४ मध्ये झाली असून, त्याच्या इतिहासात शौर्य, स्वाभिमान आणि कर्तृत्वाच्या अनेक आठवणी जपल्या गेल्या आहेत.

Loading content, please wait...