esakal | rajasthan live update: मी इथे काही भाजी विकायला आलो नाही; अशोक गेहलोतांचा संताप
sakal

बोलून बातमी शोधा

sachin_pilot_ashok_gehlot.jpg

राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडीवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होत आहे

rajasthan live update: मी इथे काही भाजी विकायला आलो नाही; अशोक गेहलोतांचा संताप

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

-गिरीराज सिंह मलिंगा यांच्या आरोपावर सचिन पायलट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी दुखी आहे, पण मला आश्चर्य वाटलं नाही, असं ते म्हणाले आहेत. आमदार गिरीराज सिंह मलिंगा यांनी सचिन पायलट यांच्यावर गंभीर आरोप केले होते. भाजपात जावे यासाठी त्यांना 35 कोटींचे आमिष दाखवण्यात आल्याचं ते म्हणाले होते. गिरीराज सिंह मलिंगा मागील वर्षी बहुजन समाजवादी पक्षातून काँग्रेसमध्ये आले आहेत.

-पक्षातील काही नेते स्वत:चे हित पक्षाच्या हिताच्या वर ठेवत आहेत. पक्षश्रेष्ठी पक्षासाठी
आणि देशासाठी काय योग्य आहे याचा निर्णय घेईल. आम्ही त्यांचा निर्णय कठोरपणे पाळू. काही नेत्यांना आपण पक्षातील वरिष्ठ नेत्यांपेक्षा मोठे असल्याचं वाटत आहे, असं म्हणत गेहलोत यांनी पायलट यांचे नाव न घेता टीका केली आहे. 

-  राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडीवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. सभापतींच्या नोटीसीला आव्हान देणाऱ्या बंडखोर आमदारांच्या याचिकेवर आज निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजस्थानच्या राजकीय युद्धात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांपैकी कोणाच्या बाजूने न्यायालय निर्णय देते हे आज स्पष्ट होईल.

-राजस्थान विधानसभा अध्यक्षांनी सचिन पायलट यांच्यासह अन्य बंडखोर आमदारांना नोटीस पाठवून विचारलं होतं की, पक्षविरोधी कृत्य केल्याप्रकरणी त्यांना अयोग्य का ठरवलं जाऊ नये?  या नोटीस विरोधात आमदार राजस्थान उच्च न्यायालयात गेले आहेत. विधानसभेचे अधिवेशन सुरु नसताना अक्ष्यक्ष अशी नोटीस काढू शकत नाहीत, असे आमदारांचं म्हणणं आहे. न्यायालयात त्यांच्या याचिकेवर सुनावणी होत आहे. त्यामुळे न्यायालय आज काय निर्णय देते याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

-मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पाटलट यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पायलट गेल्या सहा महिन्यांपासून भाजपसोबत आमचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असं मी वारंवार सांगून पाहिलं. पण कोणीही माझा विश्वास केलं नाही. कुणालाच वाटतं नव्हतं की हा निष्पाप चेहरा काही षडयंत्र रचत आहे.  मी इथे काही भाजी विकायला आलो नाही, मी मुख्यमंत्री आहे, असं म्हणत गेहलोत यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.