Sonia Gandhi: सोनिया गांधींचा ‘मॉर्फ’ व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonia Gandhi

Sonia Gandhi: सोनिया गांधींचा ‘मॉर्फ’ व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याला अटक

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचा चेहरा ‘मॉर्फ’ केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी ट्विटरवर पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे.(Man arrested for posting morphed video of Congress leader Sonia Gandhi )

बिपिन कुमार सिंह असं या आरोपीचं नाव आहे. राजस्थानमधील प्रतापगड पोलिसांनी ही कारवाई केली. लता शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

अटकेनंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आरोपीला १४ मार्चपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रतापगडचे पोलीस अधीक्षक अमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांचा मॉर्फ केलेला व्हिडीओची ट्विटरने दखल घेत त्यांनी आरोपीला इशारा देत तो व्हिडीओ तातडीने हटवण्यास सांगितले.

मात्र, आरोपीने ट्विटरच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं. यानंतर ट्विटरने हे व्हिडीओ ट्वीट ब्लॉक केलं. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Sonia GandhiCongress