esakal | म्हणून त्यांनी मुलाचे नावच ठेवले 'काँग्रेस'
sakal

बोलून बातमी शोधा

Rajasthan Man Names His Second Baby Congress
  • राजस्थानमधील विनोद जैन यांनी आपल्या नवजात मुलाचे नाव काँग्रेस असे ठेवले आहे.

म्हणून त्यांनी मुलाचे नावच ठेवले 'काँग्रेस'

sakal_logo
By
वृत्तसेवा

उदयपूर: राजस्थानमधील विनोद जैन यांनी आपल्या नवजात मुलाचे नाव काँग्रेस असे ठेवले आहे. त्यांना त्यांच्या मुलाच्या जन्माचा दाखलाही मिळाला आहे. यामध्ये दाखल्यावर मुलाचे नाव काँग्रेस जैन असे लिहिण्यात आले आहे. विनोद जैन आणि त्यांचे कुटुंबीय अनेक दशकांपासून काँग्रेसचे समर्थक आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या कार्यालयात विनोद जैन हे प्रसारमाध्यम अधिकारी म्हणून काम पाहतात.

आता काढा चालता-चालता रेल्वे तिकीट

आपली येणारी पुढील पिढीही आपल्या पावलांवर पाऊल टाकून चालावी असे विनोद जैन यांना वाटते. या एकमेव कारणामुळे त्यांनी आपल्या मुलाचे नाव काँग्रेस पक्षाच्या नावावरून ठेवले असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत बोलताना जैन म्हणाले की, 'माझ्या मुलाचे नाव काँग्रेस ठेवल्यामुळे माझ्या कुटुंबातील काही सदस्य नक्कीच नाराज झाले. मात्र, आपल्या मुलाचे नाव काँग्रेस ठेवण्यावर मी ठाम होतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जैन पुढे म्हणाले की, 'मला मुलगा झाल्यास मी त्याचे नाव काँग्रेस ठेवणार हे अगोदरच जाहीर केले होते. माझ्या मुलाचा जन्म जुलै महिन्यात झाला. मात्र, त्याच्या जन्माचा दाखला मिळे पर्यंत दीर्घ कालावधी गेला. राज्य सरकारने त्याच्या जन्माचा दाखला दिला असून यात माझ्या मुलाचे नाव काँग्रेस जैन असे लिहिण्यात आले आहे.'