esakal | आता काढा चालता-चालता रेल्वेचे तिकीट
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : रेल्वेस्थानकावर युटीएस ट्रेन तिकीट ऍपची माहिती देताना शैलेंद्रकुमार सिंग, कैलास सादरे.

रेल्वेस्थानकावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना रांगेतून मुक्तता करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने 'यूटीएस ट्रेन तिकीट मोबाईल अॅप'ची निर्मिती केली आहे.

आता काढा चालता-चालता रेल्वेचे तिकीट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - रेल्वेस्थानकावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना रांगेतून मुक्तता करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने 'यूटीएस ट्रेन तिकीट मोबाईल अॅप'ची निर्मिती केली आहे. या अॅपमुळे प्रवाशाला अगदी चालतानाही आपले रेल्वे तिकीट काढण्याची सोय करून देण्यात आली आहे. 

यूटीएस ट्रेन तिकीट अॅपची प्रवाशांना माहिती व्हावी यासाठी रेल्वेस्थानकात स्टॉल लावण्यात आला आहे. या स्टॉलवरून प्रवाशांना यूटीएस ट्रेन तिकीट अॅपची माहिती आणि डाऊनलोडही करून दिल्या जात आहे. हे अॅप गूगल प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. या अॅपच्या माध्यमाने प्रवाशांना कुठल्याही रेल्वेचे जनरल तिकीट काढता येते.

त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्म तिकीट आणि सिझन तिकीट (मासिक पास) काढण्याची सोय करून देण्यात आली आहे. यासाठी रेल्वेस्थानकावर स्टॉल लावण्यात आला आहे. शैलेशकुमार सिंग आणि तिकिट परिक्षक कैलास सादरे हे प्रवाशांना माहिती देण्याच्या बरोबरच ऍप डाऊलोड करून देण्यास मदत करीत आहेत. 

...तर संजय राऊतांचं तोंड वंगणानं काळं करू

मोबाईल तिकीट बुकिंसाठी यूटीएस ऑन मोबाईल अॅप प्लेस्टोअरमधून डाऊन लोड करावे, त्यानंतर रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन करून आर वॉलेट रिचार्ज करावे लागेल, वॉलेट रिचार्ज झाल्यानंतर हवे ते तिकीट बूक करता येईल. बूक झालेले तिकीट मोबाईमधून दाखवता येतो.

त्यामुळे प्रवासाला निघाल्यानंतर घरातून बाहेर पडताच रिक्षात असताना किंवा रेल्वेस्थानकावर आल्यानंतर अॅप डाऊनलोड करून तिकीट बुक करून प्रवास करता येणार आहे. 

 एका क्‍लिकवर वाचा औरंगाबादची गुन्हेगारी     
 
काय आहे अॅप? 

मोबाईलवर ऍप डाऊनलोड केल्यानंतर रिचार्ज करणे आवश्‍यक आहे. प्रवासाच्या तिकीट दराच्या प्रमाणात रिचार्ज करून तिकीट काढता येते. रिचार्ज लाइफटाइम असल्याने पैसे उरले तरीही पुढच्या प्रवासाच्या वेळी पुन्हा तिकीट बूक करता येते. 

वंशाचा दिवा मुलगा नव्हे, मुलगी