
राजस्थानच्या मंत्रिपुत्राला बलात्कार प्रकरणी समन्स
नवी दिल्ली/जयपूर - राजस्थानचे कॅबिनेट मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित याच्याविरुद्ध बलात्कार प्रकरणी समन्स जारी करण्यात आले. त्यासाठी दिल्ली पोलिसांचे १५ जणांचे पथक राजस्थानात दाखल झाले आहे, मात्र रोहित फरार झाला आहे. त्याला १८ मे रोजी हजर होण्याचा आदेश पोलिसांनी दिला आहे. रोहितवर २३ वर्षांच्या एका युवतीने बलात्काराचा आरोप केला आहे. ती पूर्वी एका दूरचित्रवाणी वाहिनीत सुत्रसंचालिका म्हणून काम करीत होती.
तिने आरोप केला आहे की, आपल्याला सवाई मोधोपूर येथे नेण्यात आले. तेथे पेयात काहीतरी मिसळण्यात आले. त्यानंतर रोहितने अनेक वेळा बलात्कार केला. सध्या आपले कुटुंब मंत्री आणि त्यांच्या मुलाच्या दहशतीखाली आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशी अहवालानुसार जयपूरस्थित महिलेवर गेल्या वर्षी आठ जानेवारी ते यंदा १७ एप्रिल दरम्यान अनेक वेळा अत्याचार झाला. दरम्यान, पोलिसांना रोहितचा ठावठिकाणा अद्याप शोधता आलेला नाही. त्यामुळे त्याची चौकशी होऊ शकलेली नाही. त्याचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आले आहे.
Web Title: Rajasthan Ministers Son Summoned In Rape Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..