सचिन पायलट अडचणीत; राजस्थानच्या राजकीय नाट्यात दिवसभरात तीन मोठ्या घडामोडी

कार्तिक पुजारी
Monday, 27 July 2020

राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय संकटात तीन मोठ्या घडामोडी समोर आल्या आहेत.

जयपूर- राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय संकटात तीन मोठ्या घडामोडी समोर आल्या आहेत. बसपा विधायकांच्या काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. दुसरीकडे राजस्थान उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करुन राज्यपाल कलराज मिश्र यांना पदावरुन हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय रणदीप सुरजेवाला यांनी सचिन पायलट गटातील 3 आमदार परत येणार असल्याचा दावा केला आहे. 

पारशी धर्मीयांसाठी कोरोना लसीचे 60 हजार डोस राखीव; जाणून घ्या कारण!
राज्यपाल यांना हटवण्याची याचिका

राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांना पदावरुन हटवण्याची याचिका सोमवारी राजस्थान उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. राज्यपाल मिश्र हे प्रामाणिकपणे आपल्या पदाचा कार्यभार सांभाळत नाहीयेत. त्यामुळे त्यांना पदावरुन हटवण्यात यावे. याबाबतची याचिका वकील शांतनु पारीक यांनी दाखल केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे विधानसेभेचे अधिवेशन भरवू पाहात आहेत. मात्र, राज्यपाल मिश्र याला परवानगी देत नाहीयेत. या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

पायलट गटाचे तीन आमदार परतणार

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी पुढच्या 48 तासात पायलट गटातील 3 आमदार गेहलोत यांच्यासोबत येतील असा दावा केला आहे. सचिन पायलट यांच्यासोबत 19 आमदार आहेत, त्यातील 3 आमदार पुन्हा परतण्याची शक्यता आहे. असं झाल्यास सचिन पायलट यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. मात्र, यावर स्पष्ट असं काही सांगण्यात आलं नाही. 

"माझे राजकीय करिअर संपले तरी चालेल, पण खोटं बोलणार नाही"
मदन दिलावर यांची याचिका फेटाळली

बसपाच्या 6 आमदारांचे काँग्रेसमध्ये करण्यात आलेल्या विलयासंदर्भात याचिका फेटाळण्यात आली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने या याचिकेला आधारहिन म्हटलं आहे. विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांनी काँग्रसमध्ये विलय झालेल्या 6 बसपा आमदारांवर अयोग्य ठरवण्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असं म्हणत माजी मंत्री मदन दिलावर यांची याचिका दाखल केली होती. राजस्थान उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. याप्रकरणात बसपानेही याचिका दाखल केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajasthan political crices three major updates