Rajasthan political: राजस्थानमधील नेत्यांना काँग्रेसची तंबी! काढले 'हे' आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajasthan political crisis

Rajasthan political: राजस्थानमधील नेत्यांना काँग्रेसची तंबी! काढले 'हे' आदेश

Rajasthan political crisis: राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षादरम्यान काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. काँग्रेस नेत्यांना काही सुचना जाहीर केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, राजस्थान काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही मंत्र्याने किंवा नेत्याने कोणतेही वक्तव्य करू नये. पक्षाच्या कार्यकर्त्याने अन्य पक्षाविरोधात वक्तव्य करू नये.

ही पक्षाची अंतर्गत बाब आहे. पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याने किंवा नेत्याने कोणत्याही प्रकारचे वक्तव्य केल्यास पक्षाच्या नियमानुसार कारवाई केली जाईल. वेणुगोपाल यांनी एक पत्र जारी करून म्हटले आहे की, काँग्रेस नेत्यांनी आपल्या वक्तृत्वावर नियंत्रण ठेवले नाही तर कठोर कारवाई केली जाईल.

टॅग्स :RajasthanCongress