esakal | सचिन पायलट यांनाच दणका; दोन मंत्र्यांसह पदावरुन हकालपट्टी
sakal

बोलून बातमी शोधा

Rajasthan Political Crisis, Sachin Pilot

प्रियांका गांधी यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली असून सचिन पायलट यांचे मन वळवण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरु असल्याचेही वृत समोर आले होते. मात्र सचिन पायलट यांच्यावर आता पक्षानेच कारवाई करत पदावरुन हटवले आहे.

सचिन पायलट यांनाच दणका; दोन मंत्र्यांसह पदावरुन हकालपट्टी

sakal_logo
By
सुशांत जाधव

काँग्रेसने सचिन पायलट यांना मोठा दणका दिलाय. त्यांची उपमुख्यमंत्री आणि राजस्थान काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यासह अन्य दोन मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचा निर्णय देखील पक्षाने घेतलाय. सचिन पायलट यांच्या जागी गोविंद सिंह यांची राजस्थान काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर जयपूरमध्ये काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत 102 आमदारांनी उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यासह दोन मंत्र्यांना हटवण्यासंदर्भातील प्रस्ताव मंजुर करण्यात आला. 

ना भाजप ना काँग्रेस; सचिन पायलट यांनी निवडला हा पर्याय?

प्रियांका गांधी यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली असून सचिन पायलट यांचे मन वळवण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरु असल्याचेही वृत समोर आले होते. मात्र सचिन पायलट यांच्यावर आता पक्षानेच कारवाई केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ता रणदीपसिंह सुरजेवाला यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

यापूर्वी सचिन पायलट यांनी उघड उघड बंडखोरी करण्याची भूमिका घेतल्यानंतर काँग्रेसने सोमवारी आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला सचिन पायलट यांच्यासह त्यांच्या गोटातील अनेक आमदारांनी दांडी मारल्याचे पाहायला मिळाले. या बैठकीला उपस्थितीत आमदारांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह माजी काँग्रेस अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांच्याकडे सचिन पायलट यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना समर्थन दिले होते.