ना भाजप ना काँग्रेस; सचिन पायलट यांनी निवडला हा पर्याय?

वृत्तसंस्था
Monday, 13 July 2020

राजस्थानमध्ये राजकीय वातावरण गरम असताना काँग्रेसनेते उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अशातच ते काँग्रेस पक्षातही राहणार नसल्याचे बोलले जात असून त्यांचा बंडखोरीचा पवित्रा कायम असल्याचे बोलले जात आहे. सचिन पायलट यांनी ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला असून ना भाजप ना काँग्रेस अशा पर्यायाचा ते विचार करत आहेत.

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये राजकीय वातावरण गरम असताना काँग्रेसनेते उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अशातच ते काँग्रेस पक्षातही राहणार नसल्याचे बोलले जात असून त्यांचा बंडखोरीचा पवित्रा कायम असल्याचे बोलले जात आहे. सचिन पायलट यांनी ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला असून ना भाजप ना काँग्रेस अशा पर्यायाचा ते विचार करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन पायलट हे तिसरी आघाडी बनवू शकतात. पायलट यांच्या नवीन पक्षाचं नाव प्रगतिशील मोर्चा किंवा प्रगतिशील काँग्रेस असे असून शकतं. सचिन पायलट यांची तिसरी आघाडी बनवण्यामागे अनेक महत्त्वाच्या बाजू समोर येत आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीत सचिन पायलट यांचे समर्थन करणाऱ्या आमदारांची संख्या इतकी जास्त नाही जेणेकरुन काँग्रेस सरकार पडेल.
-----------------
राजस्थानात सत्ताबदल झाल्यास मायावतींना होणार सर्वाधिक आनंद 
------------------
काँग्रेसची मध्यरात्री अडीच वाजता पत्रकार परिषद; केला 'हा' मोठा दावा
------------------
काँग्रेसने आमदारांना व्हिप जारी केला आहे. ज्यात पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना सहभागी व्हावं लागेल. जे या बैठकीला हजर राहणार नाहीत अशांविरोधात कारवाई केली जाऊ शकते. अशा परिस्थिती सचिन पायलट तिसऱ्या आघाडीचा पर्याय स्वीकारु शकतात. दरम्यान, सचिन पायलट यांना काँग्रेसच्या ३० आमदारांचे समर्थन मिळाले, जर त्यांना या आमदारांची साथ मिळाली आणि त्यांनी तिसरी आघाडी बनवली तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सरकारचं नुकसान होऊ शकतं. पण तिसरा गट बनवण्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाच्या एक तृतियांश आमदारांचे पाठबळ लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत सचिन पायलट यांना ३५-४० आमदारांचे समर्थन लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin pilot may found new Political Party