राजस्थानमधील राजकीय संघर्ष संपेना; आता मुख्यमंत्र्यांच्या गटात नाराजीचा सूर

Rajasthan Political Crisis Sachin Pilot Returns To Jaipur Ashok Gehlot In Jaisalmer
Rajasthan Political Crisis Sachin Pilot Returns To Jaipur Ashok Gehlot In Jaisalmer

जयपूर : राजस्थानमधील (Rajsthan) राजकीय संघर्ष काही केल्या संपताना दिसत नाही. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांचे बंड शमल्यानतंर त्यांची घरवापसी झाली आणि काँग्रेसमधील (Congress) तणाव आता निवळला असल्याचे सगळीकडे चित्र निर्माण झाल्याचे पाहायला मिळत होते. पण, आता सचिन पायलट यांच्या घरवापसीने मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांच्या गटात नाराजीचा सूर असल्याचे दिसून येत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

काल (ता. ११) मंगळवारी जैसलमेरमध्ये गेहलोत समर्थक आमदारांच्या (Gehlot Camp MLA) एका बैठकीत गेहलोत समर्थक आमदारांत नाराजीचा सूर असल्याचा अंदाज आला. अशोक गेहलोत समर्थक असणाऱ्या काही आमदारांनी बंडखोर आमदारांना सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचे स्थान देण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे. परंतु आपण पक्षश्रेष्ठींच्या निर्ययाचे पालन करणार असल्याचेही आमदारांचे म्हणणे आहे. यातून अशोक गेहलोत समर्थक आमदारांची नाराजी स्पष्ट दिसू येत आहे.

आज (ता. १२) काँग्रेससाठी महत्वाचा दिवस आहे. पायलट आणि गेहलोत यांच्या गोटातील आमदारांची आज एकत्र बैठक होणार आहे. अशोक गेहलोत समर्थक आमदार ११ वाजेपर्यंत जयपुरमध्ये पोहोचणार आहेत. त्यांना जयपुरच्या फेयरमाउंट हॉटेलमध्ये थांबविण्यात येण्याची शक्यता आहे. अशात या बैठकीत काय निर्णय होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण पायलट यांच्या बंडखोरीनंतर काँग्रेस आमदारांची ही पहिलीच एकत्रित बैठक असणार आहे. दरम्यान, पायलट यांची घरवापसी झाल्यानंतर त्यांनी सांगितले होते की, मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. परंतु, आपल्यासोबत असणाऱ्या आमदारांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्यावर कुठलीही द्वेषात्मक कारवाई व्हायला नको असल्याचेही मत पायलट यांनी व्यक्त केले होते. त्यासोबत पक्षाने नेमलेली तीन सदस्यीय समिती लवकरच तिचे काम सुरु करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com