Rajasthan : मी ठरवलं तर आमदारांना सोबत आणण्याची जबाबदारी माझी असेल; सचिन पायलटांचा मोठा दावा

राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्यासाठी गहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकच लढणार नाहीत, अशी शक्यता आहे.
Ashok Gehlot Sachin Pilot
Ashok Gehlot Sachin Pilotesakal
Summary

राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्यासाठी गहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकच लढणार नाहीत, अशी शक्यता आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सोनिया-राहुल-प्रियांका गांधी (Sonia Gandhi) यांची पहिली पसंती असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांचा उत्तराधिकारी ठरविण्यावरून काँग्रेस पक्षात अभूतपूर्व कलह निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या 102 पैकी 82 गहलोत समर्थक आमदारांनी मुख्यमंत्रिपदाचे नवे दावेदार सचिन पायलट यांना ‘गद्दार’ ठरवून त्यांची निवड मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला.

तर, राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्यासाठी गहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकच लढणार नाहीत, अशी शक्यता आहे. काँग्रेसचे बडे नेते आणि लोकप्रतिनिधी गांधी कुटुंबाचे आदेश जुमानत नसल्याचं चित्र या कलहातून तयार झालं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पायलट यांना नेहमीच ‘गद्दार’ म्हटलंय. मात्र, सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी गहलोतांना नेहमीच वडिलांसारखं मानलंय. पायलट म्हणाले, गेहलोत यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचं आहे. यात ते यशस्वी झाले तर माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत. तत्पूर्वी, पायलट यांनी पक्षाच्या उच्चाधिकार्‍यांची भेट घेऊन या परिस्थितीची माहिती दिली. पक्षानं मला मुख्यमंत्री केलं तर आमदारांची व्यवस्था करण्याची जबाबदारी सर्वस्वी माझी असेल, असा दावा त्यांनी केलाय.

Ashok Gehlot Sachin Pilot
Iran Hijab Row : 'हिजाब'विरोधात इराणी महिला आक्रमक; 700 जणींना अटक, 41 लोकांचा मृत्यू

हायकमांड नाराज

राजस्थान काँग्रेसमधील (Rajasthan Congress) राजकीय गोंधळ थांबण्याचं नाव घेत नाहीये. एकीकडं सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावलीय, तर दुसरीकडं अशोक गेहलोत यांना कोणत्याही परिस्थितीत पायलट यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाहीये. दोनच दिवसांपूर्वी राजस्थानला पोहोचलेल्या निरीक्षकांनी आमदारांची बैठक बोलावली, तेव्हा गेहलोत यांच्या सांगण्यावरून सर्व आमदार सभापती सीपी जोशी यांच्या घरी जमले आणि त्यांनी राजीनामे सादर केले. मात्र, या प्रकारामुळं हायकमांडही नाराज आहे.

Ashok Gehlot Sachin Pilot
PFI वर भाजपा सरकारनं अजून बंदी का घातली नाही? काँग्रेस प्रवक्त्याचा थेट सवाल

पक्षप्रमुख आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावू शकतात

राजस्थानमधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी-वाड्रा (Priyanka Gandhi) यांनी सोमवारी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यानंतर अजय माकन, मल्लिकार्जुन खर्गे, केसी वेणुगोपाल, कमलनाथ यांनीही सोनियांची भेट घेतली. या सर्व नेत्यांनी राजस्थानमध्ये सुरू असलेल्या गदारोळावर बरंच विचारमंथन केलं. त्यामुळं आवाज उठवणाऱ्या बंडखोर आमदारांना पक्षप्रमुख कारणे दाखवा नोटीस बजावू शकतात, असं मानलं जात आहे.

Ashok Gehlot Sachin Pilot
Gujarat : ओवैसींचं मोदींना थेट चॅलेंज; तीन उमेदवारांची केली घोषणा, हिंदू उमेदवारालाही उतरवलं मैदानात

सचिन पायलट आमदारांच्या संपर्कात

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर सचिन पायलट यांनी सध्या मौन बाळगण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाची ते वाट पाहत आहेत. दरम्यान, ते त्यांच्या समर्थक आमदारांच्याही सतत संपर्कात आहेत. सध्याची परिस्थिती पाहता त्यांनी आमदारांना गप्प राहण्यास सांगितलंय. पायलट यांनी हायकमांडला आश्वासन दिलंय की, जर त्यांना मुख्यमंत्री केलं तर आमदारांना सोबत आणण्याची जबाबदारी त्यांची असेल. पण, गेहलोत मुख्यमंत्री व्हायला नाही पाहिजेत. हायकमांड जो काही निर्णय घेईल, त्याला माझा पाठिंबा असेल, अशीही ग्वाही त्यांनी दिलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com