esakal | 'या' राज्यात १ जुलैपासून सुरु होणार शाळा; राज्य सरकारचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Rajasthan schools to reopen from July 1 State education minister

राज्यस्थान सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला असून राजस्थानमधील सर्व शाळा १ जुलैपासून खुल्या केल्या जाणार आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे शाळा-कॉलेज कशी सुरु होणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता. यासंदर्भात राजस्थान सरकारने निर्णय घेतला आहे. 

'या' राज्यात १ जुलैपासून सुरु होणार शाळा; राज्य सरकारचा निर्णय

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राज्यस्थान सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला असून राजस्थानमधील सर्व शाळा १ जुलैपासून खुल्या केल्या जाणार आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे शाळा-कॉलेज कशी सुरु होणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता. यासंदर्भात राजस्थान सरकारने निर्णय घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंद सिंह दोस्तारा यांनी ५० हून अधिक शिक्षणसंस्थांशी संवाद साधला. यावेळी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राजस्थानमधील शाळा १ जुलैपासून खुल्या करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. शिक्षकांना २६ किंवा २७ जूनपासून शाळेत हजर राहावे लागणार आहे. 

जगाची चिंता वाढवणारी बातमी : कोरोनामुक्त झालेल्या वुहानमध्ये पुन्हा सापडला रुग्ण

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक कॅलेंडरमध्ये बदल केला जाऊ शकतो. कोरोनामुळे खूप वेळ वाया गेला आहे, त्यामुळे प्रवेश प्रक्रिया लवकर सुरु करावी असा सल्ला शिक्षक संघटनेने दिला. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रवेश देखील लवकरच सुरु केले जाणार आहेत. इंग्रजी आणि हिंदी माध्यमाची प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. राजस्थानमध्ये बोर्डाच्या परीक्षा देखील लवकरच होण्याची शक्यता आहे. १० वी आणि १२ वी वर्गाच्या परीक्षांसंदर्भात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी बोलून निर्णय घेतला जाणार असल्याचे दोस्तारा यांनी सांगितले आहे.