esakal | जगाची चिंता वाढवणारी बातमी : कोरोनामुक्त झालेल्या वुहानमध्ये पुन्हा सापडला रुग्ण

बोलून बातमी शोधा

China orders retest of recovered Covid-19 patients intensified screening of asymptomatic cases

जगाची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली असून, कोरोनामुक्त झालेल्या चीनमधील वुहान शहरता आता पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे. चीनमधील हुबेई प्रांताच्या आरोग्य विभागाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. चीनमधील वुहानमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला असून अन्य ठिकाणी १४ नवे रुग्ण सापडल्याचे सांगण्यात आले आहे.

जगाची चिंता वाढवणारी बातमी : कोरोनामुक्त झालेल्या वुहानमध्ये पुन्हा सापडला रुग्ण
sakal_logo
By
वृत्तसंस्था

बिजिंग : जगाची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली असून, कोरोनामुक्त झालेल्या चीनमधील वुहान शहरता आता पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे. चीनमधील हुबेई प्रांताच्या आरोग्य विभागाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. चीनमधील वुहानमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला असून अन्य ठिकाणी १४ नवे रुग्ण सापडल्याचे सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

चीनमध्ये १४ नव्या करोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी २ रुग्ण हे शांघायमध्ये आढळले आहेत. राष्ट्रीय आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार १४ पैकी ११ रुग्ण हे जिनिल प्रांतातील, शांघायमधील तर १ एक हुबेई प्रांतातील असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ३ एप्रिलनंतर या ठिकाणी एकाही व्यक्तीत कोरोनाची लक्षणं सापडली नव्हती. परंतु, आता पुन्हा एकदा चीनमध्ये करोनाचे रुग्ण सापडले आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग रुग्णालयात दाखल

चीननं गुरूवारी सर्वच क्षेत्र कमी धोक्याची क्षेत्र असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर चीनच्या उत्तरपूर्व जिनिल प्रांतातील शुलान या शहरात रविवारी कोरोनाग्रस्त ११ रुग्ण आढळून आले. त्यापूर्वीही एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, या घटनेनंतर चीननं शुलान या शहराला धोक्याचं क्षेत्र असलेल्या यादीत टाकलं आहे. तसेच, चीनच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत चीनमध्ये ८२ हजार ९०१ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४ हजार ६३३ जणांचा मृत्यू झाला आहे.