

Rajasthan zilla parishad Panchayat Election Results
esakal
Rajasthan Zila Parishad Election Results : राजस्थानमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर काँग्रेस जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राजस्थान राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, पंचायत समितीच्या ३ हजार ७५८ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर भाजपला २ हजार २१३ जागांवर समाधान मानावे लागत आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकारमधील काही मंत्र्यांच्या मतदारसंघांतही भाजपला पराभवाचा सामना करावा लागल्याने या निकालांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.