esakal | कोरोनाची लस खरी की बनावट कशी ओळखाल?
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

कोरोनाची लस खरी की बनावट कशी ओळखाल?

sakal_logo
By
सुधीर काकडे

कोरोनाशी (Covid-19) सध्या संपुर्ण जग युद्ध लढत आहे. कोरोनाशी लढताना लसीकरणाची (Vaccination) मोहीम आज जगभरात राबवली जाते आहे. या लसीकरण मोहिमेत अनेक ठिकाणी लसीकरणाच्या नावाने फसवणूकीच्या घटना घडल्या आहेत. बनावट लस आढळल्याच्या अनेक घटना बातम्यांमधून आपल्या समोर आल्या आहेत. त्यामुळे लसीकरण करण्यासाठी नागरिकांमध्ये शंका निर्माण होत आहेत. दक्षिणपुर्व आशिया आणि अफ्रिकेमध्ये कोविशील्डची बनावट लस आढळून आली होती. याच पार्श्वभुमीवर जागतिक आरोग्य संघटनेने याबद्दल जागृक राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार केंद्र सरकारने राज्यांना खरी आणि बनावट लस (Fake vaccines) ओळखण्यासाठीचे निकष सांगितले आहेत.

केंद्र सरकारने शनिवारी या संबंधीत माहिती देणारे पत्र राज्यांना दिले असून, या पत्रात राज्यांना कोव्हॅक्सिन, कोविशील्ड, आणि 'स्पुटनिक व्ही' या लसींबद्दलची माहिती दिली आहे. जेणेकरुन खरी आणि खोटी लस ओळखता येणार आहे.

देशात सध्या कोव्हॅक्सिन, कोविशील्ड, आणि स्फुटनिक-व्ही या लसीच लसीकरणासाठी वापरल्या जाता आहेत. या लसी कशा ओळखाव्यात यासाठीचे निकष.

कोविशील्ड

- या लसीवर SII अर्थात सिरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाचे प्रोडक्ट लेबल लावलेले असते.

- कोविशील्ड हे नाव ट्रेडमार्क सह लिहीले आहे.

- जेनेरिक नावाची अक्षर बोल्ड फॉन्टमध्ये लिहीलेली नसतात.

- तसेच या लसीवर CGS NOT FOR SALE असे लिहीलेले असते.

हेही वाचा: ‘सीरम’मध्ये होणार ‘स्पुटनिक व्ही’चे उत्पादन

कोव्हॅक्सीन

- नावावर अदृष्य UV हेलिक्स असते, जे फक्त UV लाईटमध्ये पाहता येऊ शकते.

- लसीवर मुख्यनावाजळ बारिक अक्षरांमध्ये COVAXIN असे लिहीलेले असते.

स्पुटनिक व्ही

-'स्पुटनिक व्ही' ही लस रशियाच्या दोन वेगवेळ्या कारखान्यांतून येते, त्यामुळे दोन्ही लसींचे लेबल वेगवेळे आहेत. लसीवरील माहिती आणि इतर भाग सारखाच आहे, फक्त मॅन्युफॅक्चरचे नाव वेगळे असते.

-आतापर्यंत आयात केलेल्या लसींमध्ये फक्त ५ एम्प्युलच्या पॅकेट्सवरच इंग्रजीमध्ये लेबल आहे. या व्यतिरीक्त इतर पॅकेट्सवर रशियन भाषेत लेबल असल्याची माहिती एनडीटीव्हीने दिली आहे.

loading image
go to top