esakal | रजनीकांत यांचा राजकारणाला कायमचा रामराम, घेतला हा मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Rajinikanth,Rajini Makkal Mandram, BJP, NDA, Tamil Nadu

रजनीकांत यांचा राजकारणाला कायमचा रामराम, घेतला हा मोठा निर्णय

sakal_logo
By
स्वाती वेमूल

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत Rajinikanth यांनी राजकारणाला कायमचा रामराम केला आहे. रजनी मक्कल मंद्रम Rajini Makkal Mandram हा त्यांचा पक्ष विसर्जिक करण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतला आहे. फोरमच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. 'भविष्यात राजकारणात येण्याची माझी कोणतीच योजना नाही', असं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं. त्यांचा रजनी मक्कल मंद्रम हा पक्ष विसर्जित होईल आणि त्याचं 'रजनीकांत रासिगर नारपानी मंद्रम' किंवा 'रजनीकांत फॅन्स वेलफेअर फोरम'मध्ये रुपांतर करण्यात येईल. (Rajinikanth confirms no politics decision dissolves his rmm party)

फोरमच्या सदस्यांसोबत बैठकीपूर्वी रजनीकांत यांनी पत्रकारांना सांगितले होते की, त्यांच्या राजकीय प्रवेशावरील अनेक प्रश्नांबाबत त्यात चर्चा केली जाईल. 'मी राजकारणात प्रवेश करावं की नाही यावर आम्ही चर्चा करू. कोविड, निवडणुका, शूटिंग आणि अमेरिकेतील वैद्यकीय तपासणीमुळे मी याआधी कार्यकर्त्यांना भेटू शकलो नव्हतो', असं ते म्हणाले होते. रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी राजकारणात एन्ट्री करणार नसल्याची घोषणा केली होती. प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

'मी एक राजकीय पक्ष सुरू करण्याचा आणि राजकारणात सक्रिय होण्याच विचार केला होता. परंतु वेळ अशी होती की हे शक्य झालं नाही. भविष्यात राजकारणात येण्याचा माझा कोणताही विचार नाही. त्यामुळे रजनी मक्कल मंद्रम हे लोकांच्या हितासाठी फॅन चॅरिटी फोरम म्हणून काम करेल', असं रजनीकांत यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. रजनीकांत हे गेल्या आठवड्यात अमेरिकेहून परतले. त्यानंतर त्यांनी 'आरएमएम'च्या RMM सदस्यांशी चेन्नईत सोमवारी सकाळी भेट घेतली. या बैठकीत त्यांनी पक्ष विसर्जित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

loading image