Rajiv Gandhi Assassination Case: राजीव गांधींचे मारेकरी भारतातूनही मुक्त; मायदेशी श्रीलंकेकडं रवानगी

या तिघांना भारतात निर्वासित छावणीमध्ये ठेवण्यात आलं होतं, आता केंद्रीय गृहमंत्रालयाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्यांना श्रीलंकेत पाठवून देण्यात आलं.
Rajeev Gandhi
Rajeev Gandhi

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या तीन दोषींची काही महिन्यांपूर्वी तुरुंगातून माफीच्या तत्वावर सुटका झाली होती. त्यानंतर आज या तिघांना त्यांचा मूळ देश असलेल्या श्रीलंकेला परत पाठवून देण्यात आलं. चेन्नई विमानतळावरुन सकाळी त्यांची रवानगी झाली. (Rajiv Gandhi assassination case convicts Muguran Robert and Jayakumar deported to Sri Lanka)

मुगुरन, रॉबर्ट अन् जयकुमार अशी तीन दोषी आरोपींची नावं आहेत. या तिघांची शिक्षा पूर्ण झालेली नाही किंवा त्यांची निर्दोष सुटकाही झालेली नाही. पण सुप्रीम कोर्टानं संविधानातील विशेष अधिकारांतर्गत त्यांची सन २०२२ मध्ये सुटका केली होती. पण त्यानंतर त्यांना त्रिची निर्वासित छावणीमध्ये ठेवण्यात आलं होतं.

सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि केंद्रीय गृहखात्यानं क्लिअरन्स दिल्यानंतर या छावणीतून २ एप्रिल २०२४ रोजी या चौघांची सुटका करण्यात आली. त्यांतर आज सकाळी चेन्नई विमानतळावरुन त्यांची श्रीलंकेला रवानगी करण्यात आली. या चौघांना मोठ्या पोलीस बंदोबस्तात चेन्नई विमानतळावर नेण्यात आलं. (Latest Marathi News)

Rajeev Gandhi
Fadnavis Attack on Pawar: महात्मा गांधींच्या वर्ध्यातून पंजा हद्दपार...; फडणवीसांनी मानले शरद पवारांचे आभार

अशी झाली होती राजीव गांधींची हत्या

२१ मे १९९१ रोजी राजीव गांधी यांची तामिळनाडूतील एका रॅलीदरम्यान आत्मघाती बॉम्बनं उडवून देऊन हत्या करण्यात आली होती. राजीव गांधींच्या गळ्यात एका महिलेनं फुलांचा हार टाकला या हारमध्ये बॉम्ब बसवण्यात आला होता. या हत्येप्रकरणी मुरुगन, संथन, पेरारीवलन, नलिनी, रॉबर्ट पायस, जयाकुमार आणि रविचंद्रन हे सात जण कोर्टात दोषी ठरले होते.

Rajeev Gandhi
Arvind Kejriwal: तिहारमध्ये केजरीवालांचं वजन 5 किलोंनी घटलं! डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता

असा झाला खटला

स्थानिक कोर्टानं याप्रकरणी एकूण 26 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. पण मे 1999मध्ये सुप्रीम कोर्टाने 19 लोकांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. तर इतर सातपैकी नलिनी मुरुगन, श्रीहरन, संथन आणि पेरारिवलन हे चौघे दोषी ठरले होते त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली तर रविचंद्रन, रॉबर्ट पायस आणि जयकुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. (Marathi Tajya Batmya)

या चौघांनी दयेचा अर्ज दाखल केला होता. त्यावर तामिळनाडूच्या राज्यपालांनी ही शिक्षा जन्मपठेपेत रुपांतरित केली होती. तसेच इतरांची याचिका 2011 मध्ये राष्ट्रपतींनी फेटाळली होती. सर्व दोषी मुदतपूर्व सुटका व्हावी म्हणून बराच काळ कायदेशीर लढाई लढत होते.

Rajeev Gandhi
Rashmi Barve: आधी लोकसभेचा अर्ज आता जिल्हा परिषद सदस्यत्वही रद्द; काँग्रेसच्या रश्मी बर्वेंना दुसरा धक्का

तामिळनाडू सरकारची शिफारस

तामिळनाडू सरकारनेही त्यांची मुदतपूर्व सुटकेसाठी राज्यपालांकडं शिफारस केली होती. राज्यपालांनी ही विनंती मान्य करुन पुढील मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडं पाठवली होती. दरम्यान, पेरारिवलन याला टाडा कोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, नंतर सुप्रीम कोर्टानं दयेचा अर्ज निकाली काढण्यास विलंब झाल्याचं सांगत फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती. (Latest Maharashtra News)

त्यानंतर राजीव गांधींच्या हत्येप्रकरणी दोषी आढळलेले नलिनी श्रीहरन आणि पी रविचंद्रन यांची जेलमधून मुक्तता करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. न्या. बी. आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं त्यांची वागणूक समाधानकारक असल्यानं त्यांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच सुटका करण्याची परवानगी दिली होती. कलम 142 चा वापर करून हा आदेश देण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com