Rajiv Gandhi हत्येतील नलिनी गांधी परिवाराची भेट घेणार? म्हणाली, माझा नवरा जिथं जाईल तिथं..

'माजी पंतप्रधानांना मी मारलं असं तुम्हाला वाटतं का? माझ्यावर 17 हत्येचे गुन्हे दाखल आहेत.'
Rajiv Gandhi Nalini Sriharan
Rajiv Gandhi Nalini Sriharanesakal
Summary

'माजी पंतप्रधानांना मी मारलं असं तुम्हाला वाटतं का? माझ्यावर 17 हत्येचे गुन्हे दाखल आहेत.'

माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हत्येप्रकरणी नलिनी श्रीहरन (Nalini Sriharan) आणि इतर दोषींची शनिवारी तामिळनाडू तुरुंगातून सुटका करण्यात आली. हे सर्व दोषी 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात होते.

तुरुंगातून सुटल्यानंतर नलिनीनं तामिळनाडू (Tamil Nadu) आणि केंद्र सरकारचे आभार मानले. ती म्हणाली, 'मी निर्दोष आहे. या ठाम विश्वासानंच मला इतकी वर्षे जिवंत ठेवलं.' वेल्लोर तुरुंगातून सुटल्यानंतर लगेचच नलिनी वेल्लोर सेंट्रल जेलमध्ये (Vellore Central Jail) गेली, जिथून तिचा पती व्ही. श्रीहरन उर्फ ​​मुरुगनची सुटका झाली. नवऱ्याला भेटल्यानंतर नलिनी खूप भावूक झाली होती.

Rajiv Gandhi Nalini Sriharan
Patanjali Medicines Ban : योगगुरू बाबा रामदेवांना मोठा धक्का; पतंजलीच्या 5 औषधांवर बंदी!

नलिनी म्हणाली, मी 32 वर्षांत तुरुंगातला नरक अनुभवलाय. मात्र, माझ्यातल्या विश्वासानं मला इतकी वर्षे जिवंत ठेवलं आहे. कारण, मी निर्दोष आहे. तुरुंगात नियमितपणे योगा केल्याने मी स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकले.' आता आपली सुटका झालीय, तुम्ही गांधी कुटुंबातील (Gandhi Family) कोणाला भेटणार आहात का? असं विचारलं असता नलिनी म्हणाली, माझी अशी कोणताही योजना नाहीये. माझा नवरा जिथं जाईल तिथं मी जाईन,' असंही तिनं सांगितलं.

Rajiv Gandhi Nalini Sriharan
Terrorist Attack : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा कामगारांवर अंदाधुंद गोळीबार; TRF नं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

माजी पंतप्रधानांना मी मारलं असं तुम्हाला वाटतं का? माझ्यावर 17 हत्येचे गुन्हे दाखल आहेत. नलिनीनं लंडनमध्ये आपल्या मुलीकडं जाऊन भविष्यात पती आणि मुलीची काळजी घेण्याची इच्छा व्यक्त केली. तिनं केंद्र, राज्य सरकार आणि त्यांच्या सुटकेला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. दरम्यान, राजीव गांधी हत्येतील दोषी रॉबर्ट पायस आणि जयकुमार यांना येथील पुझल तुरुंगातून सुटल्यानंतर विशेष निर्वासित छावणीत नेण्यात आलं. पायस आणि राजकुमार हे श्रीलंकेचे नागरिक आहेत. पॅरोलवर बाहेर आल्यानंतर, किनारी थुथुकुडी जिल्ह्यात राहणारा सहावा दोषी पी रविचंद्रन याला मदुराई तुरुंगात आणण्यात आलं, जिथं त्यानं औपचारिकता पूर्ण केली आणि त्याला सोडण्यात आलं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर, तुरुंग प्रशासनानं चार श्रीलंकन ​​नागरिकांसह सर्व सहा दोषींना सोडण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com