मोदीच नाही तर गांधीही झुकलेत; बळीराजासाठी लढले होते बाबा टिकैत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahendra singh tikait
राकेश टिकैत यांच्या वडिलांनीही राजीव गांधी सरकारला झुकवलं होतं

मोदीच नाही तर गांधीही झुकलेत; बळीराजासाठी लढले होते बाबा टिकैत

केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय काल पंतप्रधान मोदींनी घेतला आणि देशभरात शेतकरी आंदोलनाची चर्चा सुरू झाली. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाला असून, सत्याग्रहाच्या मदतीने शेतकऱ्यांनी मोदी सरकारला झुकवल्याचं विरोधकांकडून बोललं जातंय. मात्र केंद्र सरकारला शेतकऱ्यांसमोर झुकावं लागल्याची ही पहिली वेळ नाही. दिल्लीतील आजच्या शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करणारे शेतकरी नेते राकेश टीकैत यांचे वडील बाबा महेंद्रसिंह टिकैत यांनी देखील अशाच पद्धतीने दिल्लीला झुकायला लावलं होतं.

हेही वाचा: Farm laws: शेतकऱ्यांचा वर्षभराचा संघर्ष

राकेश टिकैत यांचे वडील बाबा महेंद्रसिंह टिकैत हे मोठे शेतकरी नेते होते. महेंद्रसिंह टिकैत यांच्या आयुष्याचा प्रवास मोठ्या संघर्षाचा होता. 1935 मध्ये मुझफ्फरनगरच्या सिसौली गावात जन्मलेल्या चौधरी महेंद्रसिंग टिकैत यांचं सगळं आयुष्य शेतकऱ्यांना संघटित करण्यात गेले. भारतीय किसान युनियनच्या स्थापनेनंतर, 1986 पासून ते अराजकीय संघटना राहण्याचा त्यांचा सतत प्रयत्न होता. त्यांचाच वारसा घेत राकेश टिकैत आज या चळवळीत सक्रीय झाले आहेत. आज मोदी सरकारला झुकायला लावणाऱ्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या राकेश टीकैत यांच्या वडीलांची ताकद सुद्धा मोठी मोठी होती. महेंद्रसिंह यांनीही राजीव गांधी सरकारला झुकायला लावलं होतं. राजीव गांधी यांच्या सरकारला महेंद्रसिंह टिकैत यांनी आपल्या मागण्या करायला लावल्या होत्या.

हेही वाचा: हुतात्म्यांची मोदींनी माफी मागावी; केजरीवालांची मागणी

महेंद्रसिंह टिकैत यांच्या आंदोलनाकडे देखील राजीव गांधी सरकारने सुरूवातीला दुर्लक्ष केलं होतं. मात्र १५ ऑक्टोबर १९८८ ला महेंद्रसिंह टिकैत यांनी ५ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांसह दिल्लीला धडक दिली. दिल्लीच्या विजय चौकापासून ते इंडिया गेट पर्यंत आठवडाभर चाललेल्या या ठिय्या आंदोलनानंतर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींना सुद्धा झुकावं लागलं होतं.

हेही वाचा: शेती कायदे : पडलं तरी नाक वर

उत्तर भारताला शेतकरी आंदोलनांचा मोठा इतिहास आहे. राकेश टिकैत यांच्या वडिलांच्या आधी वीर भगतसिंगच्या परिवारातून देखील शेतकरी नेते समोर समोर आले होते. भगतसिंगाचे काका अजित सिंग, चौधरी छोटुराम सिंग यांनी देखील अशाच प्रकारची आंदोलन करत ब्रिटीशांना झुकवलं होतं. उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी आणि चळवळीतील नेत्यांनी शेतीसाठी आंदोलन करत दिल्लीला तब्बल १०० पेक्षा जास्त वेळा झुकवलं आहे.

loading image
go to top