राजीव प्रताप रुडी यांनी केले विमानाचे सारथ्य | Rajiv Pratap Rudi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajiv Pratap Rudi
राजीव प्रताप रुडी यांनी केले विमानाचे सारथ्य

राजीव प्रताप रुडी यांनी केले विमानाचे सारथ्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बंगळूर, कोल्हापूर - ‘माजी केंद्रीय मंत्री आणि आमचे सहकारी राजीव प्रताप रुडी यांनी आज मी प्रवास करीत असलेल्या विमानाचे सारथ्य केले, याचा मला अतिशय आनंद झाला आहे,’ असे ‘ट्विट’ खासदार संभाजीराजे यांनी आज केले.

पोर्ट ब्लेअर ते बंगळूर या हवाई मार्गावरील हा अनुभव संभाजीराजे यांनी छायाचित्रासह पोस्ट केला आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे, की संसदीय अभ्यास दौरा संपवून अंदमानच्या पोर्ट ब्लेअर विमानतळावरून बंगळूर हवाईमार्गे मुंबईस येत आहे. या प्रवासात वैमानिक म्हणून आमचेच सहकारी रुडी आहेत.

संसदीय अभ्यास दौऱ्यासाठी तेही आमच्यासोबत होते. सहकारी खासदार मित्रच आपला वैमानिक आहे, याचा एक वेगळाच आनंद आहे. भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे व केविन अँटो अँटनी हेसुद्धा सोबत आहेत.

राजीव प्रताप रुडी हे व्यावसायिक वैमानिक आहेत. पोर्ट ब्लेअर येथील पर्यटनावरील संसदीय अभ्यास दौरा संपल्यानंतर मुंबईला येत विमानाचे सारथ्य रुडी यांनी केले. जगातील पहिले खासदार वैमानिक म्हणून रुडींचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे.

loading image
go to top