
नवी दिल्ली : ‘‘भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणे ही माझी जबाबदारी आहे,’’ असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले. तिन्ही सैन्यदलांबरोबर समन्वय साधून देशाच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलणे माझे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले. राजधानी दिल्लीत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या सनातन संस्कृती जागरण महोत्सवात ते बोलत होते.