Rajnath Singh: भारत-पाक संघर्ष तिसऱ्या पक्षामुळे थांबला नाही; राजनाथ सिंहांचे स्पष्ट वक्तव्य
Operation Sindoor: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की ‘ऑपरेशन सिंदूर’ हे कोणाच्याही म्हणण्यावर थांबविले गेले नव्हते. दहशतवाद्यांविरोधातील लढाई सुरू होती आणि भविष्यात हल्ला झाल्यास ती पुन्हा सुरू होईल.
हैदराबाद : भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू असताना एकाच्या म्हणण्यावरून (अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प) ऑपरेशन सिंदूर थांबविण्याचा आल्याचा दावा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फेटाळून लावला.