
'बलात्कार केला, व्हिडीओ काढले, गोळ्या खायला लावल्या'; मंत्र्याच्या मुलावर गुन्हा
जयपूर : राजस्थानमधील एका कॉंग्रेस नेत्याच्या मुलावर बलात्काराचा आरोप लावला आहे. मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित जोशी याच्यावर एका २३ वर्षाच्या तरुणीने बलात्कार केल्याचे आरोप केले आहेत. जयपूर आणि दिल्ली मध्ये बलात्कार केल्याचा आरोप केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
(Jaipur Congress Minister Rape 23 Year Old Women)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरच्या एका महिलेने कॉंग्रेस नेत्याच्या मुलाने ८ जानेवारी २०२१ ते १७ एप्रिलच्या दरम्यान आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात उत्तर दिल्लीत अपहरण, मद्यपान करुन बलात्कार करणे, अनैसर्गिक आत्याचार, विनयभंग आणि धमकी अशा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा: रुपया कोमात, डॉलर जोमात; भारतीय चलनाची आत्तापर्यंतची सर्वांत मोठी घसरण
तरुणीने पोलिसांना सांगितलं की, मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित जोशी याच्याशी माझी मागच्या वर्षी फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर आमच्यामध्ये ओळख वाढल्यावर त्याने मला भेटण्यासाठी बोलावले होते. "त्या रात्री त्याने मला दारु पाजली, मला दारु जास्त झाली होती, मला त्या रात्री काही कळालं नाही. सकाळी उठल्यावर त्याने माझे नग्न फोटो आणि व्हिडीओ मला दाखवले आणि मला रडू फुटले." असं तीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितलं आहे.
"त्यानंतर त्याने मला तिथेच थांबण्यास सांगितले आणि या हॉटेलमध्ये आपण नवरा बायको असल्याचं सांगून आल्याचं सांगितलं, त्यानंतर त्यांने मला लग्नाचं आमिष दाखवलं आणि दारु पिऊन मला मारहाण केली. त्यादरम्यान माझे परत व्हिडीओ काढले आणि जर याबाबत कुणाला सांगितलं तर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली." असं पिडीत तरुणी पोलिसांना सांगत होती.
हेही वाचा: पाकिस्तान ते तेलंगाणा via पंजाब; दहशतवाद्यांच्या तस्करी कारवाया सुरूच
तक्रारीनुसार आरोपीनी पिडीतेवर जयपूर आणि दिल्ली येथे वारंवार बलात्कार केला. आपण लग्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. "ऑगस्टमध्ये मला मी गरोदर असल्याचं समजलं तेव्हा त्याने माझ्या पोटात आपलं बाळ नसल्याचं सांगून मला गोळ्या खाण्यास सांगितल्या होत्या पण मी त्याला विरोध केला." असं तीने सांगितलं. दरम्यान दिल्ली पोलिसांनी याप्रकरणाबाबत राजस्थान पोलिसांना माहिती दिली आहे.
Web Title: Rajsthan Congress Minister Son Rape Crime Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..