Congress: राजस्थानात राजकीय ड्रामा! गेहलोत अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Gehlot

Congress: राजस्थानात राजकीय ड्रामा! गेहलोत अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर?

जयपूर : काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून सध्या राजस्थानातील राजकारण तापलं असून अशोक गेहलोतांच्या समर्थक असलेल्या जवळपास ८२ आमदारांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केल्याची चर्चा आहे. सचिन पायलट यांच्या मुख्यमंत्रीपदाला या आमदारांचा विरोध असून अशोक गेहलोत हे आपले मुख्यमंत्रिपद वाचवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेणार असल्याची शक्यता आहे.

(Rajsthan Congress Politics Latest Updates)

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक येत्या १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यासाठी अशोक गेहलोत आणि शशी थरूर यांच्यामध्ये लढत होणार आहे. तर गेहलोत यांना काँग्रेस अध्यक्षपदाबरोबर आपले मुख्यमंत्रिपदही आपल्याकडे ठेवायचे आहे पण काँग्रेसच्या 'एक व्यक्ती एक पद' या धोरणामुळे त्यांना जे शक्य नाही त्यामुळे त्यांनी आपल्या समर्थक आमदारांचे शस्त्र बाहेर काढले आहे. जवळपास ८२ आमदार गेहलोतांच्या समर्थनार्थ राजीनामा द्यायला तयार झाले आहेत. त्यामुळे मोठा राजकीय स्फोट निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: NIA पुन्हा ॲक्टिव्ह मोडमध्ये! संशयित PFIकार्यकर्त्यांना अटक

आपले मुख्यमंत्रिपद सांभाळण्यासाठी ते काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी समोर आली आहे. तर राजस्थानमध्ये महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर बंड होणार का याकडे लक्ष लागलेले आहे. गेहलोत आणि पायलटांमधील वाद चव्हाट्यावर आल्याने काँग्रेक्ष पक्षश्रेष्ठींचे देखील टेन्शन वाढलं आहे.

राजस्थानातील राजकीय वाद पाहता काँग्रेसने जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना राजस्थानातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाठवण्यात आले आहे. तर सचिन पायलट यांनीसुद्धा गेहलोत यांच्याविरूद्ध दंड थोपटले आहे. जर पक्षाने मला मुख्यमंत्री केलं तर आमदारांची सोय करण्याची जबाबदारी माझी असा दावा त्यांनी केला आहे. तर आता सचिन पायलट यांना राजस्थानचे मुख्यमंत्रिपद मिळणार का याकडे लक्ष लागलेले आहे.