NIA पुन्हा ॲक्टिव्ह मोडमध्ये! संशयित PFIकार्यकर्त्यांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PFI

NIA पुन्हा ॲक्टिव्ह मोडमध्ये! संशयित PFIकार्यकर्त्यांना अटक

मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) देशभरातील कार्यालयावर छापे टाकत १०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून अनेक खुलासे होऊ लागल्याने NIA पुन्हा ॲक्टिव्ह मोडमध्ये आली असून राज्यातील सोलापूर, औरंगाबादमध्ये छापे टाकत PFI संबंधित कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती आहे.

(NIA Raid On PFI Office Latest Updates)

दरम्यान, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात एकाच वेळी ATS आणि NIA ने गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने छापे टाकले आहेत. सोलापूरमधून एका संशयिताला NIA कडून अटक करण्यात आली असून PFI च्या एका कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर औरंगाबाद शहरातून १३ जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती आहे. तर ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांना राज्यातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा: Chandrakant Patil: चंद्रकांत पाटलांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा; याचिका फेटाळली

२२ सप्टेंबर रोजी NIA ने PFIच्या देशभरातील कार्यालयावर छापे टाकले होते. टेरर फंडिंग आणि दहशतवादी कारवायांच्या संशयातून छापे टाकले होते. यावेळी १०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या चौकशीतून अनेक खुलासे समोल आले होते. भाजप कार्यकर्ते आणि संघाचे मुख्यालय PFIच्या निशाण्यावर असल्याचं तपासातून समोर आलं आहे.

भारताला इस्लामिक राष्ट्र बनवायचं PFIचं उद्दिष्ट

भारताला २०४७ पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवायचं उद्दिष्ट PFIचं असल्याचं PFIशी संबंधित असलेल्या एका आरोपीने तपासात सांगितलं होतं. त्याचबरोबर मुस्लीम कार्यकर्त्यांच्या भावना हिंदुविरोधात भडकावून दिल्या जात आहेत. त्याचबरोबर त्यांची दिशाभूल करत इस्लाम धोक्यात आहे असं भासवलं जात असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

हेही वाचा: आघाडी की स्वबळ यावर काँग्रेसचे चिंतन

पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

PFIच्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर काही समर्थकांनी पुण्यात आंदोलन केले होते. त्यावेळा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे वाद पेटला असून तआरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Maharashtra NewspoliceNIA