

Jagdeep Dhankhar
sakal
नवी दिल्ली : संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेमध्ये माजी अध्यक्ष धनकड यांच्या गच्छंतींच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधकांत शाब्दिक चकमक झडली. नवे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांचे स्वागत करताना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी, माजी अध्यक्षांंना अचानक जावे लागल्याने त्यांना निरोपही देता आला नाही, असा केलेला खोचक उल्लेख सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करणारा ठरला.