

Rajya Sabha Election 2026
esakal
Modi Cabinet Reshuffle: राज्यसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असताना भारतीय जनता पक्षाने सोमवारी आणखी आठ उमेदवारांची घोषणा केली. या यादीत माजी केंद्रीय मंत्री बी. एल. वर्मा आणि हरदीप सिंग पुरी यांना पुन्हा संधी न मिळाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही नेत्यांच्या पुढील भूमिकेबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्याचवेळी केंद्रातील मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने या निर्णयाकडे विशेष लक्ष लागले आहे.