काँग्रेसमधून हकालपट्टीनंतर बिश्नोईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rajya sabha election cross voting Expelled Congress MLA from Haryana Kuldeep Bishnoi tweet

हकालपट्टीनंतर कुलदीप बिश्नोईंची प्रतिक्रिया; म्हणाले, 'कॉंग्रेसमध्ये...'

राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग (Cross Voting) केल्याप्रकरणी काँग्रेसकडून हरियाणातील आमदार कुलदीप बिश्नोई यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून हटवले आहे, दरम्यान यानंतर बिश्नोई यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. (rajya sabha election cross voting Expelled Congress MLA from Haryana Kuldeep Bishnoi tweet)

हरियाणातील काँग्रेसचे बहिष्कृत आमदार कुलदीप बिश्नोई यांनी ट्विट केले की, "काँग्रेसमध्ये काही नेत्यांसाठी नियम आहेत आणि इतरांसाठी अपवाद आहेत. नियम निवडकपणे लागू केले जातात. या आधी देखील पक्षाच्या नियमांकडे भूतकाळात वारंवार दुर्लक्ष केले गेले आहे. माझ्या बाबतीत, मी माझ्या आत्म्याचे ऐकले आणि माझ्या नैतिकतेनुसार वागलो...." असे ते म्हणाले आहेत.

त्यांनी जोडून केलेल्या दुसर्‍या एका ट्वीट मध्ये, जर कॉंग्रेस इतक्या तत्परतेने आणि जोरदारपणे 2016 मध्ये वागली असती, आणि त्यांनी गमावलेल्या प्रत्येक मोठ्या संधी बाबत निर्णय घेतले असते तर, ते अशा गंभीर संकटात सापडले नसते, असे बिश्नोई यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: Monsoon : राज्यात येत्या 5 दिवसांत मुसळधार पाऊस, IMD ची माहिती

हरियाणात 90 पैकी 89 आमदारांनी मतदान केलं, तर अपक्ष आमदार बलराज कुंडू यांनी मतदान केलं नाही. शिवाय, काँग्रेसचं एक मत निवडणूक आयोगानं रद्द केलं. त्यामुळं 88 मतं शिल्लक होती, म्हणजे 8800 मतं. दरम्यान, विजयासाठी 8800/3+1 म्हणजेच 2934 मतांची गरज होती. भाजपचे कृष्णलाल पंवार यांच्या विजयानंतर 66 मतं शिल्लक होती, जी कार्तिकेय यांच्याकडं हस्तांतरित करण्यात आली. कार्तिकेय शर्मा आणि अजय माकन यांना 29-29 (2900-2900) मतं मिळाली. दोघंही समान होते, पण भाजपला 66 मतं मिळाल्यानं कार्तिकेयची मतं 2966 झाली आणि ते विजयी झाले. काँग्रेसला क्रॉस व्होटिंग आणि एक मत अवैध ठरल्यानं हा सारा खेळ अंगलट आला.

दरम्यान राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांचा पराभव झाल्यानंतर बिश्नोई यांनी ट्वीट केले होते की, 'फन कुचलने का हुनर आता है मुझे, सांप के खौफ से जंगल नहीं छोड़ा करते.' योग्य वेळी घेतलेला निर्णय एखाद्या व्यक्तीला इतरांपासून वेगळे करतो असेही ते म्हणाले होते.

हेही वाचा: विधानपरिषद गुप्त मतदानाने, तेव्हा काय करणार?, शेलारांचा 'मविआ'ला सवाल

Web Title: Rajya Sabha Election Cross Voting Expelled Congress Mla From Haryana Kuldeep Bishnoi Tweet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top